Breaking News यवतमाळ सामाजिक

*रेमंड युको डेनिम यवतमाळ आणि निस्वार्थ सेवा फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न*

 

यवतमाळ: १७

यवतमाळ जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण काही प्रमाणात भरून निघावा व शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावे व त्यांना वणवण भटकावे लागू नये, यासाठी यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय रक्तपेढी यांना सहकार्य करण्याच्या भावनेने दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी यवतमाळ येथील *रेमंड युको डेनिम यवतमाळ आणि निस्वार्थ सेवा फाऊंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने *रक्तदान शिबिर चे आयोजन एम.आय.डी.सी.लोहारा यवतमाळ, जवळ करण्यात आले होते.

मानव संसाधन विभाग वरिष्ठ प्रबंधक .चंद्रशेखर पातुरकर, भूषण वानखडे, जयविर राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत 80 रक्त दात्यांनी रक्तदान केले आणि या प्रसंगी या उपक्रमाला युवा वर्गाचा व लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या सामाजिक उपक्रमात युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी निस्वार्थ सेवा फाऊंडेशन चे अनिकेत नवरे, परशुराम कडू, संकेत लांबट(अध्यक्ष), प्रदीप बोचरे(उपाध्यक्ष), अर्पित शेरेकर(उपाध्यक्ष) मयूर काळे, प्रविण इंजाळकर निलेश कळसकर, आकाश सहारे, कमलेश बघेल, मनोज सद्गुरु, सागर बोंडे यांनी परिश्रम घेतले. शिबीर स्थळी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाची चमू डॉ. शिवाजी आत्राम, गणेश कानडे, मधुकर मडावी, रामदास आगलावे, प्रदीप वाघमारे, सागर छत्री, रवी धाकुळकर, वैष्णवी गेडाम, कल्याणी पारधी यांनी पूर्ण प्रक्रिया मोठ्या उत्साहाने सांभाळली.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©