Breaking News यवतमाळ सामाजिक

*वीज पुरवठा खंडीत करून वसुली करणार* *महावितरणची आर्थीकस्थिती डबघाईस*

 

 

यवतमाळ : १७

यवतमाळ : गेल्या दहा महिन्यात घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक व इतर वर्गवारितील ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. ग्राहकांसाठी वीज खरेदी व वितरण करणे मुश्कील बनले आहे.परिणामी थकबाकीदाराचा वीज पुरवठा तोडून वसूली करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला गती देण्यात येणार आहे.

अमरावती परिमंडलातील घरगुती,वाणिज्यिक औद्योगिक व इतर वर्गवारितील ६ लक्ष ७११७ ग्राहकांकडे ३७३ कोटी ९३ लक्ष रुपये वीज देयकाचे थकले आहे.यातील ३ लक्ष ६ हजार ८९२ ग्राहकांनी नऊ महिन्यापासून एकदाही वीजबिले भरले नसल्याने आर्थीक परिस्थितीमुळे मेटाकूटीस आलेल्या महावितरणच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने नाईलाजास्तव सुट्टीच्या दिवशीही महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वीज ग्राहकाला दैवत माणून कोरोनासारख्या संकटात महावितरणने अखंडित वीज पुरवठा करत ग्राहकांचे जीवन सुसह्य केले. पण या काळात वसूलीच ठप्प झाल्याने महावितरणसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे वीज पुरवठा तोडून वसूली करणे हा एकच पर्याय महावितरणपुढे आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास महावितरण कटीबद्ध आहे. हेल्प डेस्कद्वारे वीज बिलांसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे, तेंव्हा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता थकित देयकांचा भरणा करावा व महावितरणची कटू कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात येत आहे.

 

चौकट

घरगुती ग्राहक – २ लाख ३० हजार ३४७

थकबाकी – १०४ कोटी ६५ लक्ष

वाणिज्यिक ग्राहक – १६ हजार ९७७

थकबाकी – १८ कोटी ८४ लक्ष

औद्योगिक ग्राहक -४ हजार २०८

थकबाकी – १६ कोटी ८८ लक्ष

सार्वजनिक सेवा – ३२८६

थकबाकी – ३ कोटी ६१ लक्ष

Copyright ©