Breaking News यवतमाळ सामाजिक

) *बँकांकडील प्रलंबित प्रस्तावांबाबत* *जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा* २) *१ चा मृत्युसह जिल्ह्यात 81 जण पॉझेटिव्ह*74कोरोनामुक्त*

 

 

यवतमाळ, दि. 16 :

विविध महामंडळांची कर्ज प्रकरणे, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत प्रस्ताव, आत्मनिर्भर योजनेंतर्गत किरकोळ व्यवसाईकांची निधी उपलब्धता प्रकरणे आदी प्रलंबित प्रस्तावांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बँकर्सच्या बैठकीत आढावा घेतला.

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, आरबीआयचे उमेश बंन्साली, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये आदी उपस्थित होते. विविध महामंडळांचे कर्जाची प्रकरणे बँकाकडे प्रलंबित आहे, याबाबत काही अडचण आहे का, असे विचारून जिल्हाधिकारी म्हणाले, बँकांकडे कर्जाचे प्रस्ताव प्रलंबित असल्यास संबंधित अधिका-यांनी बँकेच्या नियमित संपर्कात असावे. केवळ प्रकरणे पाठवून नामनिराळे होता कामा नये. तर त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. बँकांनीसुध्दा असे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढून संबंधित लाभार्थ्यांना लाभ द्यावा. आत्मनिर्भर योजनेंतर्गत किरकोळ व्यवसाय करणा-या व्यावसाईकांना दहा हजार रुपयांचे भांडवल देणे आवश्यक आहे. त्यांच्या कागदपत्रांची त्वरीत पुर्तता करून संबंधितांना दिलासा द्यावा. विनाकारण प्रकरणे अडवून ठेवू नका, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

तर गत 15 वर्षात सर्वाधिक पीक कर्जवाटप यावर्षी करण्यात आले असून हे सर्व बँकांचे यश आहे. यापुढेही अशाच कामाची अपेक्षा बँकांकडून आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बैठकीत मुद्रा योजनेची अंमलबजावणी, पीएम स्वनिधी योजना व त्याची अंमलबजावणी, महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पीक कर्ज वाटप, नाबार्डच्या योजना, ग्रामीण स्वयंरोजगार व प्रशिक्षण संस्था आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

 

बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

———————————

 

 

एका मृत्युसह जिल्ह्यात 81 जण पॉझेटिव्ह

74 कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 16 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 81 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 74 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 408 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 81 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 327 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 612 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15353 झाली आहे. 24 तासात 74 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14302 आहे. तर जिल्ह्यात एकूण 439 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 148431 नमुने पाठविले असून यापैकी 148127 प्राप्त तर 304 अप्राप्त आहेत. तसेच 132774 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Copyright ©