यवतमाळ सामाजिक

*डॉ. पवण राणे यांच्या नवीन तंत्रज्ञान वास्तुचे महेंद्र लोढा यांचे हस्ते उद्घाटन*

 

वणी :१६

 

वैद्यकीय क्षेत्रात, वणीकरांनसाठी मोलाची भूमिका वठविणारे ,युवा बालरोग तज्ञ डाॅ.पवण राणे यांच्या नविन वास्तुचा उद्घाटन सोहळा, सुपरिचित, मनमिळाऊ वणी विधान सभा क्षेत्राचे भावी आमदार महेंद्र लोढा यांच्या हस्ते संपन्न

 

वैद्यकीय सेवा ही, समाज सेवा असुन , समाजा प्रती माझी भुमिका चोख पार पाडण्याचा प्रयत्न मी निरंतर चालू ठेवणार :—- *डाॅ.पवण राणे

 

 

 

 

कर्तव्य म्हटले की ,फक्त वेळे पुरते मर्यादित, आणी इलाज म्हटले की ,काही वेळे पुरता मर्यादीत ,परंतु युवा बाल रोग तज्ञ डाॅ. पवण राणे हे ..या सर्व गोष्टींना अपवाद ठरत आहे. त्यामागील कारण म्हणजे रुग्णासाठी , असलेली त्यांची तळमळ आणी चोविस तासात , रुग्णासाठी असलेली समर्पकाची भावना , आपले सर्व काम सोडुन, सर्व प्रथम प्राधान्य देण्याची त्यांची शैली, तसेच कमी खर्चात होणार उत्तम प्रतीचा इलाज आणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, रुग्णांना झटक्यात बरे करण्याची त्यांची कला…. अशा नविन तंत्रज्ञानाचा वापर करून, होणारा चांगला इलाज, तसेच स्मित हास्य तसेच मंत्रमुग्ध करणारे त्यांचे शब्द यामुळे, रुग्ण त्वरित बरा होतांना ,पहावयास मिळत आहे. कोरोनाच्या काळात सुध्दा उत्तम प्रतीचा इलाज करुन ,संपुर्ण ग्रामीण भागात, मोठ्या प्रमाणात सुपरिचित झालेले युवा डाॅ.पवण राणे यांच्या कडे ग्रामीण भागातील जनतेचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जागेच्या कमतरतेचा अभाव लक्षात घेता ,आज त्याच्या नविन वास्तुचे लोकार्पण सोहळा, सुपरिचित व्यक्तीमत्व असलेले ,भावी आमदार ,जेष्ठ बंधू प्रिय महेंद्र लोढा सर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. या अत्याधुनिक इमारती मध्ये सुसज्ज तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला आहे. तरी बस स्थानकाच्या समोर ,जुन्या दवाखान्याच्या बाजुला

तरी वणी तालुक्यातील लोकांनी एकदा नक्कीच भेट द्यावी असे डाॅ. राणे यांनी म्हटले आहे.

Copyright ©