राजकीय विदर्भ

*विदर्भ राज्य आंदोलन समिती चे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा अमरावती येथे संपन्न…….!!*

 

विदर्भ राज्य आंदोलन समिती ची कार्यकर्ता कार्यशाळा दिनांक 12व 13फरवरी 2021अमरावती येथे यशस्वी पार पडली या दोन दिवसीय कार्यशाळा चे उद्घाटक मा.रंजनाताई मामर्डे या होत्या विदर्भाचे नेते अँड.वामनराव चटप मा.आमदार तसेच मा.रामसाहेब नेवले मुख्य संयोजक,मा अँड.अविनाश जी काळे विष्णु जी आष्टीकर मा प्रा.पुरुषोत्तम पाटील दिलीप भोयर प्रकाश लढ्ढा निळकंठ यावलकर हे सर्व मार्गदर्शक कार्यशाळा शिबीराला उपस्थित होते

या कार्यकर्ता शिबीराचे संचालन मा मधुसुदन कोवे गुरुजी यवतमाळ यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र आगीरकर यानी केले कार्यशाळा शिबीराचे महत्वपूर्ण विषय या विषयावर स्वतंत्र विदर्भ राज्य विदर्भातील एेतिहासिक वारसा विदर्भातील सिंचनाची दैनावस्था शिक्षण आरोग्य ग्रामीण भागातिल रस्ते विदर्भातील बेरोजगारी अशा अतिशय महत्वाचे विषय घेवुन कार्यकर्ता याना मार्गदर्शन करण्यात आले.

विदर्भातील विज आंदोलन शेतकरी आत्महत्या कुमारी माता आणि कुपोषण कधी थांबनार ही जबाबदारी सरकार स्विकारत का नाही अशा अनेक विषयावर दोन दिवस मार्गदर्शन सर्किट हाउस अमरावती येथे करण्यात आले होते या कार्यकर्ता शिबीरात विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या तालुका महिला अध्यक्ष मा.प्रतिभा काळे यांचा वाढदिवस साजरा केला त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केले या दोन दिवसीय शिबीराला अशोक हांडे नंदकिशोर देशमुख दिपक शंभरकर संजय हिंगे नितीन अवस्थी बाळकृष्ण राजुरकर अनिल वानखेडे माधव गावंडे सुनिल साबळे तारा बारस्कर रंजना माळवे जयश्री पोपत योगीता खरात प्रतिभा काळे माया नाटक आणि काटकर मँडम कार्यशाळा शिबीरात उपस्थितीत होत्या या शिबीरात अमरावती आणि यवतमाळ येथिल मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ता सहभागी होते

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©