Breaking News यवतमाळ सामाजिक

*घनश्याम केळकर यांची महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमा*   *दि. १४ फेब्रुवारीला हिवरी येथे पोचणार आहे*.

 

 

दि. १७ आॅक्टोबर रोजी रायगड किल्ल्यावरुन चालत निघालेले घनश्याम केळकर ९२ व्या दिवशी रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, या जिल्ह्यातून १००० किमीपेक्षा जास्त पायी प्रवास करत कोसदाणीमार्गे १४ फेब्रुवारीला हिवरी येथे पोचणार आहेत.

 

घरातील आजारपणामुळे ज्या कुटुंबांवर मोठे आर्थिक, मानसिक संकट कोसळते. याच काळात त्यांना मदतीचा हात देण्याची व्यवस्था प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्यात उभी करणे हा या परिक्रमेचा उद्देश आहे. यासाठी www.aarogyadaan.org या वेबसाईटच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

 

हिवरीमध्ये आरोग्यदान उपक्रम सुरु करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. घनश्याम केळकर १४ फेब्रुवारी रोजी हिवरीमध्ये असणार आहेत. हा उपक्रम आपल्या गावात सुरू करण्यासाठी उत्साही, सामाजिक कामाची आवड असणाऱ्या लोकांची गरज आहे.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण त्यांना ९८८१०९८१३८ या संपर्क नंबरवर फोन करु शकता

Copyright ©