यवतमाळ सामाजिक

*कणाशी ते जांभोरा पदयात्रेचे हिवरी येथे स्वागत.*

 

हिवरी :१२

महानुभाव पंथाच्या नियमानुसार अटन विजन भिक्षा भोजन बारा खांडीचा क्रम करीत करीत हिवरी या गावामध्ये वैराग्य मूर्ती आचार्य प्रवर श्री मुरलीधर मानेकर बाबा कनाशी आपल्या मार्ग मंडळी सह मुक्कामी आले असता भव्य स्वागत करण्यात आले या नंतर जामावाडी मार्गे जांभोरा येथे बाराखांडी समारोह करण्यात येणार आहे हिवरी ( हेटी) येथे आयोजित स्वागत समारंभास प. पु. म. विजयराज दादा पंजाबी जवळा (खांड) व दामोधरबाबा पंजाबी याच्या प्रमुख उपस्थितीत ग्रा.स. विनिता ओंकार चेके, कुसुंम सुखदेवराव साठे, अक्षय साठे, ओंकार चेके, कल्पना चेके सुखदेवराव साठे, छगन चेके, प्रभाकर डोळे माधुरी साठे, जयश्री चेके, खुशी चेके, करण पासवान, भरत चेके, संतोष चेके, लताताई चेके दिशा चेके, नैतिक चेके, इत्यादी या वेळी सेवेत उपस्थित होते.

Copyright ©