यवतमाळ सामाजिक

संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव या वर्षात गावा गावात नव युवक ग्राम स्वराज्य भजन मंडळ निर्माण करेलं

संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव यांच्या उपक्रमाची सुरुवात २०२१ वर्षात वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२व्या पुण्यतिथी निमित्त अतिशय प्रभावशाली झाली.म्हणुन संपूर्ण संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव यांच्या आभार कार्यक्रमा निमित्त उद्या गुरुवार ला प्रार्थना मंदिर येथे आभार बैठक आयोजित केली आहे.या बैठकीला उपस्थित मा.मधुसुदन कोवे [संस्थापक अध्यक्ष]ग्राम स्वराज्य महामंचहे राहणार आहे.या बैठकीला सर्व संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे .मा गिरीधर जी ससनकर उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा ग्राम स्वराज्य महामंच चे जिल्हा प्रतिनीधी यांच्या कल्पनेतुन निर्माण झालेलीआभार बैठक होय.प्रार्थना मंदिर राळेगाव येथे राष्ट्रसंताच्या कार्याची अमलबजावनी करण्यासाठी संपूर्ण समाज उत्सुक आहे सर्व गाव उत्सुक आहे नव युवक तयार आहे मग गुरुदेव सेवा मंडळ च्या पदाधिकारी नी आता गावातील तरुणांना हाक दिली पाहिजे.या तरुणांनो या कष्ट करणा-या नो या करु गावाची सुधारणा काही रे…म्हणुन नवयुवक ग्राम स्वराज्य भजन मंडळ निर्माण करण्यासाठी नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी चर्चा होणार आहे आभार बैठकीला काही नवीन उपक्रम चर्चेला येनार आहे महत्वपूर्ण चर्चा होणार आहे तरी गुरुदेव प्रेमी युवकांनी सुध्दा सहभागी व्हायचं आहे असे संपर्क संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव च्या वतिने करण्यात आले आहे ही आभार बैठक मा.कृष्णराव राउळकर अध्यक्ष संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव आणि मा.वाल्मिकजी मेश्राम सचिव संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव यांच्या परवानगी पुर्ण होत आहे म्हणुन सर्व संयुक्त गुरुदेव सेवा मंडळी नी आणि पदाधिकारी मंडळ यांनी या आभार बैठकीला उपस्थित रहावे आणि आपले मनोगत व्यक्त करावे हीच अपेक्षा

Copyright ©