यवतमाळ सामाजिक

घाटंजीत दुभंगलेले ओठ व टाळूची मोफत शस्त्रक्रिया शिबीर

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचा उपक्रम

घाटंजी : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या वतीने व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती, घाटंजी यांच्या पुढाकाराने दुभंगलेले ओठ व टाळूची मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्य दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत सांस्कृतिक भवन, पंचायत समिती रोड येथे करण्यात आले आहे.शिबिरात भरती रुग्णांना खाट, औषधी व संपूर्ण तपासण्या मोफत राहणार आहे. तसेच शिबिरात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना व त्यांच्या सोबत असलेल्या एका नातेवाईकाला मोफत भोजनाची सोय राहणार आहे. शिबिरासाठी मोफत नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी यायला मोफत बस सुविधा उपलब्ध आहे.रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या पालकांना २ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. रुग्णांनी आजारासंबंधी यापूर्वी केलेल्या चाचण्या व उपचाराची कागदपत्रे तसेच आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत आणावे अशी सूचना आयोजकांनी केली आहे.या शिबिरासाठी नोंदणी व सविस्तर माहितीसाठी साहेबराव पवार ८८८८९६३९९९, गंगाधर तडस ९३२५०२७०४३ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजक व महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केले आहे.या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक अरविंद जाधव, बंडू जाधव, सुनील जाधव, रवी आडे, गणेश राठोड, राजू चव्हाण, आकाश राठोड, राहुल आडे, संदीप जाधव, कैलास पवार, विजय राठोड, धनराज पवार यांनी केले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©