महाराष्ट्र सामाजिक

गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा स्नेह परिचय मेळावा, “माझी दिनदर्शिका २०२१” प्रकाशन सोहळा व हलदी कुंकू समारोह शिवडी परेल मुंबई येथे संपन्न

 

मुंबई प्रतिनिधी ०९ फेब्रुवारी – गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा स्नेह परिचय मेळावा व हळदी कुंकू व माझी दिनदर्शिका २०२१ प्रकाशन सोहळा गवळी समाजाचे राजकीय नेते व मुंबई महानगरपालिका नगरसेवक अमेयजी घोले यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी अमेयजी घोले यांनी संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व संस्थेला व गवळी सामाजासाठी जी पण मदत करता येईल तेवढी मी सर्वोतोपरी मदत करण्याचे अश्वासन त्यानी गवळी समाजाबांधव यांना संबोधित करताना दिले, वेळातवेळ कडून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल अमेयजी घोले यांचे संस्थेचे संस्थापक दिनेश भोजने यांनी आभार व्यक्त केले.

संस्थेच्या संस्थापिका सौ दिक्षाताई भोजने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गवळी सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने महिला बचत गट व स्वयंरोजगार पुढील काळात महिलाना कसा दिला जाईल या वर संस्था विचार करत आहे त्या साठी आपले फक्त सहकार्य हवे आहे आणि ते आपण द्याल अशी अशा ही त्यांनी व्यक्त केली व आलेल्या महिलाचे आभार मानले.

सामाजिक कार्य करत असताना महिलाचा मान-सन्मान कसा ठेवता येईल याची जाणीवपूर्वक काळजी गवळी सेवा फाऊंडेशन घेत असते म्हणून महिलान साठी हलदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला गवळी समाजाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, हलदी कुंकू का व कशासाठी साजरा केला जातो याबद्दल थोडीशी माहिती गवळी समाजाचे युवासमाज सेवक कु. मोरेश्वर महाडिक यांनी महिलाना दिली त्याचे ही आभार संस्थेच्या वतीने मानण्यात आले.

गवळी सेवा फाऊंडेशन या संस्थेच्या जिल्हा, तालुका, अशा काही नियुक्ती पदे अमेयजी घोले यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आले.

संस्थापक व विभाग अध्यक्ष याच्या अध्यक्षतेखाली काही समाजबांधव यांची समाजाबद्दल असलेली सामाजिक कार्याची तळमळ पाहून व त्याच्या बरोबर चर्चा करून पदनियुक्ती करण्यात आली. ज्यांच्या पदनियुक्ती करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे कोकण विभाग सल्लागार पदी सुरेश ठसाळ, कोकण विभाग सरचिटणीस पदी राजेश चौकेकर, कोकण विभाग संघटक पदी विश्वनाथ पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी शशिकांत ठसाळ, ठाणे जिल्हा सचिव पदी मनोहर महाडिक, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी समीर घोले, मुंबई प्रदेश संघटक पदी किशोर ठसाळ, मुंबई प्रदेश संपर्कप्रमुख पदी अभय घोले, मुंबई प्रदेश सचिव पदी संदिप कांबळे, ठाणे शहर अध्यक्ष पदी निलेश किलजे, ठाणे शहर संपर्कप्रमुख पदी राकेश ठसाळ, ठाणे जिल्हा दिवा विभाग अध्यक्ष पदी संदीप घोले, ठाणे जिल्हा कोपरी विभाग युवा अध्यक्ष पदी मयुरेश महाडिक, ठाणे जिल्हा मीरा भायंदर विभाग अध्यक्ष पदी लंकेश धुमाळ, रत्नागिरी जिल्हा युवा अध्यक्ष पदी ओंकार चिले, पालघर जिल्हा सल्लागार पदी प्रभाकर मरगळ, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष पदी पल्लवी गोपाळ यांची निवड करण्यात आली आहे त्यांना पुढील वाटचाली साठी अमेयजी घोले व संस्थापक व समाजबांधव यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे संस्थापक दिनेश भोजने, संस्थापिका दिक्षाताई भोजने, संघटक संदेश दर्गे, कोकण विभाग अध्यक्ष विलास खेडेकर, मुंबई अध्यक्ष प्रकाश पंदेरे, मुंबई महिला अध्यक्षा विशाखा खेडेकर व मोठया प्रमाणात समाज बांधव, महिला उपस्थित होत्या.

Copyright ©