यवतमाळ शैक्षणिक

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा.

 

यवतमाळ : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यवतमाळमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येते यामध्ये वैचारिक , प्रबोदनात्मक कार्यक्रमासोबतच वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा यवतमाळ मध्ये शिवजयंती घराघरात पोहोचविण्यासाठी “घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुली असून या स्पर्धेत पालक किवा विद्यार्थी कुणालाही सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना त्यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमेची उत्कृष्ट मांडणी करून आकर्षक सजावट करुन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील देखावा उभा करून . स्पर्धकांनी या सजावटीचे आपल्या कुटूंबा समवेत घेतलेले फोटोज , योगीराज अरसोड : ९८२२७१६२०१. महेंद्र वेरूळकर ९८८११७३११६किवा शशिकांत खडसे ७७९८३९०८७०यांच्या Whatsapp No. वर १९ फेब्रुवारी दुपारी बारा पुर्वी आपले संपूर्ण नाव व पत्यासाहित पाठवावे. आकर्षक तथा अभिनव सजावटीसाठी निवड करण्यात आलेल्या पहिल्या दहा मावळ्यांच्या घरी परीक्षक मंडळी प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षण करेल परंतु परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या सजावटीसाठी प्रथम बक्षीस: १००० ₹ रोख; द्वितीय बक्षीस:८०० ₹ रोख; तृतीय बक्षीस: ५०० ₹ रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देण्यात येईल. तसेच सहभागी सर्व मावळ्यांना सुद्धा गौरवपत्र देण्यात येईल या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ छत्रपती महोत्सवा च्या अंतिम दिवसी १९ फेब्रुवारी ला सायंकाळी ७:३० वाजता शिवतीर्थावर (शिवाजी महाराजांचा पुतळा परीसर,गार्डन रोड, बसस्थानक चौक, यवतमाळ) होईल. प्रकल्प अधिकारी म्हणून योगीराज अरसोड तर शशिकांत खडसे, महेंद्र वेरूळकर, श्रीदीप इंगोले, विजय ठाकरे, विष्णू बुटले आणि संकेत लांबट स्पर्धेचे संयोजक म्हणून काम पहात आहे असे योगीराज अरसोड, प्रकल्प अधिकारी , शिवजयंती घरात स्पर्धा यांनी, कळविले आहे.

Copyright ©