यवतमाळ सामाजिक

*मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.* 

 

 

घाटंजी : दि.८

शहरातील जय भीम चौक येथे भारतीय बौद्ध महासभा व भीमशक्ती युवा मित्र मंडळ आणि वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्याच्या वतिने स्थानिक जयभिम चौक घाटंजी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.समाजातील प्रत्येक महिलांनी रमाबाईचा आदर्श ठेवून जगले पाहिजे, असे मत संघपाल कांबळे यांनी व्यक्त केले रमाईचे जीवन उच्च आदर्शांनी ओतप्रोत भरलेले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातला अमूल्य वेळ समाजोपयोगी, देशोपयोगी व सत्कारणी खर्ची व्हावा, म्हणून रमाई स्वत:ला विसरून एका अदृश्य आगीत सतत जळली. युगप्रवर्तक, महामानव बाबासाहेब या देशातील जगावेगळ्या अस्पृश्यतेविरुद्ध लढा देत होते, तर रमाई जीवनभर दु:खात होरपळत राहिली. पण दु:खातही बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. दु:खाने माणसे मोठी होतात, हे तिने जाणले होते. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे संत तुकारामांनी म्हटले आहे. रमाई गरीब कुटुंबातील असूनही महान त्यागाच्या व कारुण्याच्या वैभवाने कोट्यवधी लोकांच्या काळजात आई म्हणून कोरली गेली.

अशा या रमाईच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.करण्यात आले या कार्यक्रम करिता सहभागी भारतीय बौद्ध महासभा चे तालुका अध्यक्ष संजय कांबळे, भीमशक्ती युवा मंडळाचे उमेश घरडे, महिला मंचाचे पद्दमाताई खोब्रागडे,रंजनाताई घरडे आणि कार्यक्रमाला उपस्थित रंजित नगराळे, रा. वी. नगराळे, प्रदीप रामटेके, एन. जी. भगत, विरेंद्र पिलावन, जितेंद्र मूनेश्र्वर,शुभम नगराळे, संजय टिपले,दुधनाथ गजभिये, संजय घुसे,पल्लवीताई गजभिये, बबिताताई मेश्राम, संघमित्रा रामटेके,निर्मला राऊत, अर्चना घुसे, मिराताई नगराळे, मंदाताई नगराळे, सरिताताई नगराळे, नलुताई फुटाणे व सर्व उपासक उपासिका उपस्थित होते.

Copyright ©