Breaking News यवतमाळ सामाजिक

*हिवरी येथे आठच दिवसाच्याआत वाघाने दुसरीही गाय केली फस्त*

 

 

हिवरी प्रती

हिवरी वनपरिक्षेत्र अंतर्गत वाघाने मोठ्याप्रमाणात हे धुमाकूळ घातला असून आज चक्क शेतातच वाघानी गाईवर हल्ला करीत आकाश उर्फ बंटी इंगोले यांच्या मालकीची गाय वाघाने फस्त केल्याने आता शेतकऱ्यान मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही गाय ३० ते ४० हजार रुपये किमतीची असल्याने सांगण्यात येत आहे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेष म्हणजे या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून वाघाची ये जा सुरू असल्याने हा वाघ अनेकांच्या दर्शनास आल्याने गुराख्यांनी व व वाहनधारकांनी या वाघोबानी दर्शन दिले आहे या अगोदर वनविभागाने क्यामेरे लावले परंतु ते सुरूच झाले नाही त्या मुळे नेमका वाघ कोणत्या जातीचा आहे हे कळू शकले नाही, विशेष म्हणजे याअगोदरही ही वाघांनी हल्ला करून मशी गायी फस्त केल्याच्या अनेक घटना आहे याप्रकरणी वनविभागाने सतर्कता बाळगली नसल्याचेदिसुनयेत आहे .

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©