Breaking News यवतमाळ सामाजिक

*बोरी अरब येथे दुचाकीचा अपघात होऊन दोघे जखमी*

 

प्रतिनिधी बोरी अरब

आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास सूतगिरणी जवळ दुचाकीचा स्लिप होऊन मोठा अपघात झाला. यामध्ये जांभोरा येथील विद्यार्थी दारव्हा येथे कॉलेजला जात असताना अचानक दुचाकी क्रमांक..MH29Y1405…. समोरून येणारे वाहन सोबतच एक आँटो येत असताना दोन्ही बाजूला असलेली गिट्टी संपूर्ण रोडवरती पसरल्यामुळे अचानक दुचाकी स्लिप झाली. यात कपिल प्रेमचंद गायकवाड (२३) व त्याच्या पाठीमागे असलेला अभय गजानन बनसोड गाडीवरून रोडवर आदळले यात कपिलच्या पायाला जबर मार लागला व त्यात त्याचा पाय निकामी झाला काही तरुणांनी तात्काळ मदत करण्यात आली केला व १०८ ला पाचरन केले त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय हलविण्यात आले. यावेळी तात्काळ मदत करण्याकरिता बोरीअरब येथील, सुरेश तिजारे,आशिष सावंकार,

रवी गिरी, बंटी हिवरकर, विशाल गुघाणे. राजेश गुप्ता,गोलु तिवारी, अर्जुनअस्वार, आकाश आरोकर व 108 चालक निलेश वालगुंजे या तरुणांनी तात्काळ मदत केली. तत्पश्चात लाडखेड येथील पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढोके यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून रुग्णाला मदत केली.या हायवेवर अपघाताचे प्रमाण वाढतच असुन याकडे संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष आहे रोडच्याअपूर्ण बांधकामामुळे रोज अपघात घडतानाचे विदारक चित्र दिसत आहे.काल सुद्धा एक दुचाकीस्वाराचा त्याच्या कुटुंबासोबत जात असताना अपघात झाला यामध्येसुद्धा त्याच्या पायाला जबर मार लागला. तरीसुद्धा लोकप्रतिनिधींचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. यामुळे तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा येथील ग्रामवाशी आंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©