यवतमाळ राजकीय सामाजिक

*भाजपाच्या सांस्कृतिक सेल व्दारा यवतमाळात “शिवगान “स्पर्धा*  

 

भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक सेल अंतर्गत, यवतमाळात जिल्हास्तरीय” शिवगान ” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत छत्रपती शिवरायांवरील पोवाडा ,पाळणा, शिवस्फूर्ती गीत, आरती ,ओवी, ललकारी, अभंग आदि प्रकारच्या गीतांचा समावेश असेल, यामध्ये वयाचे बंधन नसून ,कोणीही भाग घेऊ शकते. स्पर्धकांची नोंदणी कार्यक्रम स्थळी ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजतापासून सुरू होईल

मंगळवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी,सकाळी १० वाजता, स्थानिक दारव्हा मार्गावरील हाॅटेल झुलेलाल प्राईड (रेवती) येथे, स्पर्धेचे उदघाटन

जिल्ह्याचे नेते आमदार मदनभाऊ येरावार यांच्या शुभहस्ते,

भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे .

याप्रसंगी जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार ,शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई कोठेकर, जिल्हाअध्यक्षा मायाताई शेरे,स्पर्धाप्रमुख अमीत नानेटकर, राम गायकवाड़,महेश अडगुलवार, रविंद्र ढगे, स्मिता भट, व सांस्कृतिक सेलचे पदाधिकारी धाउपस्थित राहणार आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमाला भाजपाचे जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी, सर्व मोर्चा, व सेलचे शहर,जिल्हा पदाधिकारी, सर्व नगरसेवक ,लोकप्रतिनिधींनी मोठया संरव्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा सांस्कृतिक सेलच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार असून,समारोपीय कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना आकर्षक रकमेंचे पारितोषिके, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल. स्पर्धकांनी डाॅ. विनोद उबालकर मो. 09823832242, दिपाली पांडे 08459124146, देवयानी जोशी 09420915049, डाॅ. विवेक चौधरी 09373857138 यांचेकडे नोंदणी करावे असे सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्मिता भोईटे व कार्यकारिणी व्दारा कळविण्यात आले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©