यवतमाळ सामाजिक

जानरावजी गिरी यांनी आपला वाढदिवस केला वृद्धाश्रमात साजरा

 

अशीही आपुलकी

वाढदिवस म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास दिवस. नवीन वस्तू, कपडे खरेदीची लगबग असतेच, सोबत नामांकित हॉटेलमध्ये जाऊन केक, खाण्या-पिण्याची पार्टी होते ती वेगळीच. एकमेकांना केक भरवताना तोंडाला केक फासायचा, भरमसाट खाद्यपदार्थ ऑर्डर करायचे आणि जास्त झाले की टाकून द्यायचे. थोडक्यात काय, तर पैसा, अन्न, वेळ याची नासधूस करायची. मात्र वाढदिवस साजरा करण्याच्या या पद्धतीला समाजकार्याचे स्वरूप देत आगळावेगळा संदेश देण्याचे कार्य राळेगाव येथील यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस श्री. जानरावजी गिरी व मित्र परिवार तर्फे आर्णी तालुक्यातील उमरी पठार स्थित संत श्री. डोला महाराज वृद्धाश्रम येथे भेट देऊन करण्यात आले.

वाढदिवस साजरा करताना आपण या समाजाचे देणे लागते याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.

कुण्या एका माणसाच्या मोठ्या मदतीपेक्षा हजारो लोकांच्या छोट्या-छोट्या मदतीतुनच एक मोठी मदत तयार होत असते. आपणही आपला वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून जर तो अशा विधायक उपक्रमासाठी वापरला तर देशात एकही माणुस उपाशी झोपणार नाही, बेघर राहणार नाही, उघडा फिरणार नाही, उपचाराविणा मरणार नाही.गरज आहे फक्त हा विचार रूजवण्याची,मदत छोटी असो किंवा मोठी, ती माणुसकी जपत केली की त्याचे मोल अधीक वाढते असे मत जानराव गीरी यांनी व्यक्त केले,यावेळी प्रदीप ठुने, ऍड. फिडेल बायदानी,फिरोज लाखानी,महेश शेंडे,राजू नागतुरे,राजू पुडके,संजय पोपट,गणेश बातुलवार,निलेश हिवरकर,सुनील भामकर,शरद साखरकर, प्रलय टीप्रमवार,कवडू जुनघरे,ओमकुमार ठुने,तात्या बोभाटे व मित्र परिवारातर्फे किराणा साहित्याचे व होईल तेवढी रोख स्वरूपात मदत करण्यात आली .

Copyright ©