Breaking News यवतमाळ सामाजिक

*तुरीचे दर प्रति क्विंटल ७ हजारांच्यावर*

 

यवतमाळ:

तुरीसह इतर शेतमालाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर ७ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्यावर पोहोचल्याचे शुक्रवारी दिसून आले, त्याशिवाय हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसले. शेतकऱ्यांकडे आता फारसा शेतमाल उरला नसला तरी, काही प्रमाणात त्यांना वाढत्या दरांचा फायदा होत आहे.

जिल्ह्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक होऊनही पीक उत्पादन फारसे झाले नाही. दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. काही शेतकऱ्यांना खरीपातील तुरीचे बर्यापैकी वउत्पादन झाले, तर पाण्याअभावी रब्बी हंगामात हरभऱ्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. शासनानेही या दोन्ही शेतमालास समाधानकारक असे हमीदर घोषीत केले नाही. तुरीला ५६७५, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटल हमीभावा शासनाने जाहीर केले होते; परंतु बाजार समित्यांत मात्र या शेतमालाच हमीभावापेक्षा खूप कमी दराने खरेदी करण्यात येत होती. अगदी बाजारात या शेतमालास अपेक्षीत असे दर मिळाले नाहीत. आता मात्र गेल्या १५ दिवसांपासून बाजारात तुरीच्या दरात कमालीची वाढ होत असून, शुक्रवारी या शेतमालास ७ हजारे तीनशे रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले. यवतमाळ मंगरुळपीर आणि कारंजा बाजार समितीत अनुक्रमे ७३०० रुपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी झाली. अर्थात तुरीला हमीभावापेक्षा १००० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाले, तर हरभºयाची खरेदीही ४५०० रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी झाली. काही शेतकºयांना या वाढत्या दराचा फायदा होणार असे दिसत आहे

Copyright ©