यवतमाळ शैक्षणिक

*रमाबाई कन्या शाळेत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा*

 

यवतमाळ : ५

मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,

यवतमाळ येथे दिनांक१४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत

” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात आला.

शासनाच्या धोरणानुसार मराठी भाषेच्या वापराबद्दल जागृती निर्माण करणे व मराठी भाषेचा प्रचार- प्रसार करणे या अनुषंगाने शालेय स्तरावर शक्य तेथे प्रत्यक्षरीत्या व ऑनलाईन मराठी भाषा व साहित्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा,व्याख्याने,, कविसंमेलन, हस्ताक्षर, शुद्धलेखन, एकांकिका, वकृत्व, घोषवाक्य, अभिवाचन, वादविवाद, अंताक्षरी, शब्दाकोडी,म्हणी,निबंध,परिसंवाद, कार्यशाळा,ग्रंथदिंडी,ग्रंथप्रदर्शन,कविता-कथालेखन ,नामवंतकवी-लेखकाचा परिचय व मार्गदर्शन, मराठी तज्ञ यांचे मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे व कोविड 19 चे काटेकोरपणे पालन करून घेण्यात आले.

या सर्व कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सुलभाताई कटके यांचे मार्गदर्शन लाभले.प्रा.मराठी तज्ञ देठे व इंगळे यांनी भाषेच्या कार्यशाळांतर्ग भाषेची ओळख व परिचय करून दिला. पर्यवेक्षिका श्रीमती पिंगे व सर्व शिक्षकांनी नियोजनानुसार विविध कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रम घेतले. वर्ग ५ ते १२वि च्या विध्यार्थ्यांनिने सक्रिय सहभाग घेतला.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सौ कल्पना फुसे यांनी केले.

Copyright ©