Breaking News यवतमाळ राजकीय शैक्षणिक सामाजिक

*जिल्ह्यातील अनेक महत्व पूर्ण घडामोडी. जाणुन घ्या*

 

 

*जिल्ह्यात 38 जण पॉझेटिव्ह, 23 कोरोनामुक्त*

यवतमाळ, दि. 5 :

गत 24 तासात जिल्ह्यात 38 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 23 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 284 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 38 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 246 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 448 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14591 झाली आहे. 24 तासात 23 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13715 आहे. तर जिल्ह्यात एकूण 428 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 144439 नमुने पाठविले असून यापैकी 144155 प्राप्त तर 284 अप्राप्त आहेत. तसेच 129564 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

………………………………

 

घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन कार्यशाळा

 

यवतमाळ, दि. 5 : सन 2020-21 या वर्षात जिल्ह्यात एकूण 60 ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा – 2 अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन हा एक महत्वाचा घटक असून या घटकाची गावपातळीवर नियोजनात्मक अंमलबजावणी करायची आहे. यासाठी गावतालुका व जिल्हास्तरावर सहभागी घटकांची क्षमता बांधणी करण्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता कक्ष व जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा परीषद येथे घेण्यात आली.

 

सदर प्रशिक्षणादरम्यान स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 आणि त्यातील सांडपाणी घनकचरा घटकांची राज्यात अंमलबजावणी करण्यासंबंधी निवेदन, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन घटकांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी क्षमता बांधणीचे महत्व, प्रस्तावित उपक्रम आणि सक्रीय सहभागासाठी आवाहन, पार्श्वभुमी वैशिष्ट घटक तत्वे व महत्वाच्या तरतुदी, स्वरूप घटक व घटकवार विश्लेषण आराखडा तयार करण्यासाठीची पूर्व तयारी, सांखिकीय माहिती संकलनासाठी उपलब्ध प्रपत्रे पध्दती, माहिती प्रमाणीकरण घटकवार कामाचा संख्यात्मक तपशील, निश्चिती निधी स्त्रोत निश्चिती आराखडा अंतीम करणे, तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी, गावपातळीवरील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन आराखडा निर्मिती दरम्यान अपेक्षीत सर्व स्तरावरील सहभागी घटकांच्या आणि त्यांच्या भुमिकांचा सविस्तर तपशिल, सांडपाणी स्वरूप प्रकार, स्त्रोत प्रमाण समस्या तंत्रज्ञान निवडीसाठी महत्वाचे निकष व विविध तांत्रिक पर्याय गावपातळीवरील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

 

युनिसेफचे युसूफ कबीर, जयंत देशपांडे, अपर्णा कुलकर्णी, जयलक्ष्मी चेकला व प्रामुव्हीचे मंगेश भालेराव यांनी झुम ॲपद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाला पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार चौधर, कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, उपविभाग स्तरावरील उप. अभियंता व शाखा अभियंता, जिल्हा कक्षातील तज्ञ सल्लागार, आरोग्य संस्थाचे प्रतिनिधी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (आरोग्य), गटसमन्वयक, समुह समन्वयक यांनी पूर्ण वेळ प्रशिक्षण घेतले.

……………………………………

 

*जि.प. प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेसाठी 23 सुरक्षा रक्षक*

 

यवतमाळ, दि. 5 : जिल्हा परिषद मधील प्रशासकीय इमारत व यांत्रिकी विभागाच्या मालमत्तेची दिवस रात्र सुरक्षा करण्यात येते. यासाठी देखरेखीसाठी आळीपाळीने लावण्यात आलेल्या एकूण 23 सुरक्षा रक्षकांमार्फत त्याच्या नियोजित वेळेमध्ये ठरवून दिलेल्या ठिकाणाव्यतीरिक्त कुठेही ड्यूटी लावली जात नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीची सुरक्षा 24 तास नियमित राखल्या जाईल, याची दक्षता घेण्यात येत आहे, असे जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग क्रमांक 1 यांनी कळविले आहे

 

 

…………………………………

 

*फसवेगिरी करणाऱ्यांविरुध्द तक्रार देण्याचे ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन*

 

यवतमाळ, दि. 5 :

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी आयोग या तीन कार्यालयामार्फत पी.एम.ई.जी. व सी.एम.ई.जी.पी. या योजना राबविण्यात येत असून ऑनलाईन पध्दतीने आहे. या योजनेंतर्गत विविध उद्योगाचे ऑनलाईन अर्ज अपलोड केल्यानंतर त्यांची त्या पोर्टलवर छाननी केली जाते. या योजनेंतर्गत कार्यालयातील कर्मचाऱ्याचे व्यतिरिक्त इतर कोणत्याही खाजगी ऐजन्टची, संस्थेची, ऐजन्सीची नेमणूक या कार्यालयाने केलेली नाही. तोतयागिरी करून एजन्ट हे उद्योजक, कारागीर यांची महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नावाचा गैरवापर करून लाभार्थ्यांकडून प्रकरणे मंजूर करून देतो, असे सांगून उद्योजकाकडून त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात रक्कमेची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे फसवेगिरी करणारे एजन्ट आढळून आल्यास भुलथापास बळी पडू नये. असे कोणी करीत असल्याचे आढळून आल्यास पोलिस स्टेशनला तक्रार द्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास दुरध्वनी क्रमांक 07232-244791 या फोनवर संपर्क साधावा, असेही जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे

 

*राष्ट्रीय युवा स्वयंसेवकासाठी अर्ज आमंत्रित*

 

यवतमाळ, दि. 5 :

जिल्ह्यात युवकांचे नेटवर्क तयार करणे, भारत सरकारच्या विविध योजनेत सहभाग घेणे व युवकांचे सक्षम नेतृत्व स्विकारून राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान देण्यासाठी साक्षरता, आरोग्य, स्वच्छता, लिंगभेद, सामाजिक समस्येबाबत जागरूकता अभियान राबविणे त्यांना योग्य दिशा देण्याकरीता ग्रामीण युवक युवतींकडून प्रत्येक तालुक्याकरीता 2 असे एकूण 32 युवक युवतींची निवड करावयाची आहे. त्यासाठी व तसेच नेहरू युवा केंद्र उकार्यालयाकरीता 2 युवक युवती कॉम्प्युटर कार्य करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

 

शैक्षणिक पात्रता किमान एस.एस.सी. उत्तीर्ण (उच्च शिक्षण, पदवी, पदव्युत्तर व बेसिक कॉम्प्युटर ज्ञान असलेल्यांना प्राधान्य), वयोगट 18 ते 29 असावे. उमेदवाराकडे स्मार्ट मोबाईल फोन व त्याचे विविध ॲपसंबंधी बेसिक माहिती ई-बँकींग, डिजीधन, सोशल मिडीया इत्यादी ज्ञान असलेल्यांना प्रथम प्राधान्य. नेहरू युवा केंद्र संगठण सोबत संलग्नीत युवा मंडळाच्या युवकांना प्राधान्य. शिक्षण सुरु असणाऱ्या युवक युवती या पदाकरीता पात्र ठरणार नाही.

 

नेहरू युवा केंद्राच्य वेबसाईट www.nyks.nic.in वर या योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर दिनांक 20 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. ऑनलाईनअर्ज करण्यास अडचण येत असल्यास आवश्यक कागदपत्रांसह दि. 19 फेब्रुवारी 2021 पर्यंत नेहरू युवा केंद्र कार्यालयात चंदन नगर, वडगांव रोड, यवतमाळ या पत्यावर संपर्क साधावा, असे जिल्हा नेहरू युवा केंद्राचे युवा समन्वयक यांनी कळविले आहे

Copyright ©