यवतमाळ राजकीय

मनसेचा दणक्याने भांबोरा सॅनेटायझर प्रकरणात बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी अखेर निलंबित

 

घाटंजी तालुक्यातील भांबोरा उपक्रेंद्रा अंतर्गत कापशी या ठिकाणी पोलिओ डोज च्या दिवशी लहान बालकांना चक्क सॅनेटायझर पाजण्यात आले हा प्रकार धक्कादायक होता.आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला होता या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनसेने दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली होती.काल अखेर या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही मनसेच्या दणक्याने आरोग्य विभाग आणि जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केली.
भांबोरा प्रकरणात आरोग्य विभागाने तडकाफडकी कार्यवाही चा आव आणत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बळी दिल्याचा आरोप मनसेने केला होता आणि वास्तविकतेत या घटनेत या उपकेंद्राचे डॉ. मनवरआणि डॉ. मसराम यांचा गलथन कारभार जबाबदार होता या कर्मचाऱ्यांचे पोलिओ प्रशिक्षण घेणे गरजेचे होते तेच घेण्यात आले नव्हते हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात प्रशासनाने डॉ. मनवर आणि मसराम कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणे आवश्यक होते परंतु यात त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मनसेने केला होता याची गंभीर दखल प्रशासनाने घेत कार्यवाही केली.भांबोरा उपकेंद्रा प्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र असाच गोंधळ सुरू असून संपूर्ण जिल्ह्यातील उपकेंद्राच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी मनसेने या कार्यवाहीवर केली.या प्रसंगी बोलताना मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रकरणात दोषींना जोपर्यंत बडतर्फ करत नाही आणि फौजदारी गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मनसे या प्रकरणाचा पाठपुरावा करेल असे मत व्यक्त करत प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि प्रसिद्धी माध्यमांचे सुद्धा आभार व्यक्त केले.या प्रकरणात प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, विकास पवार, अभिजित नानवटकर, सादिक शेख, सचिन एलगंधेवार, अमित बदनोरे, संदिप भिसे, सौरभ पत्रकार यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होतेे.

Copyright ©