यवतमाळ राजकीय

*पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेने सायकल चालवून केंद्र सरकार चा केला निषेध*

 

 

आर्णी प्रतिनिधी/ ५

 

केंद्र सरकारने नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला त्या वेळी केंद्र सरकार ने पेट्रोल डिझेल वर सेस लावल्यामुळे पेट्रोल २.५० रु तर डीझेल 4 रु याने महाग झाले आहे,परिणामी मालवाहतूकीचे दर वाढून महागाई ची झळ सर्व सामन्य जनतेला सहन करावी लागणार आहे.

२०१३ या वर्षी जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ९८ डॉलर एवढी होती त्यावेळेस भारतीय किरकोळ बाजारात पेट्रोल ची किंमत ७३ रुपये प्रति लिटर एवढे होते आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल ५३ डॉलर निम्मी किंमत असतानासुद्धा पेट्रोल डिझेल च्या किमती भरमसाठ वाढ करण्यात आली आहे याचा निषेध म्हणून आज आर्णी येथे शिवसेना पक्षा तर्फे केंद्र सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला शिवसेना कार्यकर्त्यांनी सायकल चालवून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.

प्रवीण भाऊ शिंदे,रवी भाऊ राठोड,पंकज शिवरामवार,बबलू देशमुख,पवन वाघमारे,उत्तम राठोड,आला पवार, धनराज राठोड,अमोल जाधव, गणेश राठोड,निखिल खरोळ,लक्ष्मण पठाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध मोर्च्यात सहभागी झाले.

Copyright ©