यवतमाळ सामाजिक

विज तोडणे पेक्षा जोडण्याचे काम करा आर्णी भाजप चे निवेदन

आर्णी :-
तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे तालुका व शहर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ता. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीला उप अभियंता नरेंद्र राऊत उपविभागीय कार्यालय आर्णी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना लॉकडाऊन कालावधी मध्ये तालुक्यातील नागरिकांचे रोजगार गेले. हाताला काम नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने विजबीलात माफी करावी अशी अपेक्षा होती. परंतु राज्य सरकारने ही परिस्थिती बघुन विज ग्राहकांना विजविलात काही सुट मिळवून द्यायला पाहिजे होती परंतु तसे न होता. जादा दराने विजबील आकारण्यात आली. महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करू नये, नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले. ह्या परिस्थितीचा अभ्यास करून विज वितरण कंपनीने जादा आकारलेली विजबील माफ करावी अशी मागणी निवेदनात केलेली आहे.
यावेळी शहराध्यक्ष विशाल देशमुख, जिल्हा सचीव राहुल सोयाम, भाजयुमो जिल्हा सचीव वीनोद राठोड, प्रकाश राठोड, प्रमोद आडे, प्रकाश जाधव, योगेश गोले, राजेश माहेश्वरी, गजानन ठाकरे, भास्कर राऊत, बलदेव आडे, देवा राठोड हे उपस्थित होते.

Copyright ©