Breaking News यवतमाळ सामाजिक

*खबरदार वीज कनेक्शन कापाल तर*           *मदनभाऊ येरावार*

 

 

 

” *वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज कनेक्शन कापायला गेल्यास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ढाल बनून उभा राहील*”- *आमदार मदन येरावार*

 

” लॉक डाऊन काळातील वीज बिलातील 100 युनिटपर्यंतचे बिल माफ करण्यात येईल, अशी घोषणा करणारे महाआघाडी सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपला शब्द फिरवला व या महाआघाडी सरकारने 75 लाख वीज कनेक्शन कापण्याचे आदेश दिले. चार कोटी जनतेला अंधारात ढकलण्याचे पाप करणार्‍या या महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्ष जाहीर निषेध करीत असून जर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कनेक्शन कापण्यास जातील तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ढाल बनून मध्ये उभे राहतील” असा इशारा यवतमाळ विधानसभेचे आमदार मदन भाऊ येरावार यांनी आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना दिला.

 

महाविकास आघाडी सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन कापण्याचे आदेश जारी केले आहेत. याचा विरोध करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितिन भुतडा यांच्या सुचनेप्रमाणे भारतीय जनता पार्टी यवतमाळ शहर च्या वतीने आमदार श्री मदन भाऊ येरावार, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनी वर “हल्लाबोल व ताळेबंद” आंदोलन केले व शेकडो कार्यकर्त्यांनी आज बस स्टैंड चौकातील वीज वितरण कंपनीला टाळे ठोकले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील, जिल्हा महामंत्री राजूभाऊ पडगीलवार, प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, आध्यात्मिक आघाडीचे शंतनू शेटे, अजय बिहाडे, शहर सरचिटणीस अजय खोंड, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, महिला मोर्चाच्या मायाताई शेरे, रेखाताई कोठेकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकार सचिन येवले यांना पोलिसांनी मारहाण केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी केली.

 

या आंदोलनात जितेंद्र वीरदंडे, दत्ता भाऊ कुलकर्णी, मनोज इंगोले, मोहन देशमुख, नितीन गिरी, अजय राऊत, विजय कोटेचा, सुरज गुप्ता,विजय खडसे, संजय शिंदे पाटील, ज्ञानेश्वर सुरजूसे, शुभम सरकाळे, अश्विन बोपचे, रोहित राठोड, रमेश फुलकर, प्रशांत देशमुख, सुनील बावनकुळे, सुनील समदूरकर, अशोक लुटे, संजय खडसे, जयदेव लकडस्वार, जयंत झाडे, राजुभाऊ घोडे, भीमसेन केशवानी, विकास जोमदे, देवा राऊत, अंकुश बघमारे, विशाल बावणे, भावीन पतीरा, रवी कडव, श्रीकृष्ण कांबळे, दिलीप मडावी, राकेश मिश्रा, सुरज विश्वकर्मा, शुभम चोरमले, दिलीप मादेशवार, देविदास अराठे, सचिन व्यास, प्रमोद कुटे, योगेश पाटील, सुरज जैन, हिमांशू, वैशाली खोंड, सुषमा राऊत, भारती जाठे, लता ठोंबरे, ज्योती मानमोडे, साधना काळे, शैला मिर्झापुरे, राधिका बकळ, माणिक पांडे, प्राजक्ता टिकले, प्रणिता खडसे, राहुल हरसुले, दीपक लंगोट, दिगंबर पट्टे, अनिल बापट इ. 100 चे वर कार्यकर्ते सहभागी झालेत.

Copyright ©