Breaking News यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*शहरातील खाजगी शाळेमध्ये होत आहे विद्यार्थांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष* 

 

 

 

*कोविड-19च्या नियमाचे खाजगी शाळेत होत आहे सर्हास उल्लंघन*

 

मागिल कित्येक महिन्यापासून (कोवीड-19 ) या जिवघेण्या वायरसने संपुर्ण भारतात सह महाराष्ट्रात सुध्दा मोठा कहर केला होता. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात लाॅक डाऊनची परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे शासकीय आणी खाजगी शाळा मागील कित्येक महिन्यापासून बंद ठेवण्यात आल्या होत्या ..!

परंतु काही दिवसापासून (कोविड-19) च्या नियमाचे योग्य पालन करुन, खाजगी शाळांना विद्यार्थांना शिकवणी साठी बोलावण्यास परवानगी देण्यात आली.

परंतु शहरातील मोठ मोठ्या खाजगी शाळेमध्ये (कोविड-19) , नियमाचे सर्हास उल्लंघन करतांना पहायला मिळत आहे. या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची सॅनिटाझरची व्यवस्था नसुन , मास्क सुध्दा लावले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक अंतर सुध्दा नसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थांना जर कोरोना सारख्या जिवघेण्या वायरसने विळख्यात घेतल्यास जवाबदार कोण?? फक्त वार्षिक फि चा तगादा लाऊन , दूरध्वनी द्वारे पालकांना नाहक त्रास देणार्या या खाजगी शाळा, (कोवीड-19) नियमाचे उल्लंघन करीत असेल तर ,अशा हलगर्जीपणा करणार्या शाळेवर ,शिक्षण विभागाने योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.

असे पालकांनमधुन बोलले जात आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©