यवतमाळ सामाजिक

महिलांच्या औद्योगिक कल्पकतेला निर्मितीची जोड देणारा “कारभारनी मंच” स्थापन

 

महेश पवार यांच्या विचारातून मंचाची निर्मिती .
हजारो महिलांच्या उपस्थित मंचाची स्थापना .
महिलाच उभारणार महिलांची बाजारपेठ .

लॉकडाऊन लागले रोजगार संपला . मजुरांना गुलाम म्हणून जगण्याची वेळ आली असतांना महिलांच्या वाट्याला पुरुषांच्या पेक्षा जास्त अडचणी आल्यात . तेव्हा फक्त शासकीय उपाययोजनांवर अवलंबून न राहता महेश पवार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या गृह उद्योगाला चालना मिळण्यासाठी कारभारणी या नावाने महिला मंचाचे मंगळवारी जलाराम मंदिर घाटंजी येथे थाटात उद्घाटन संपन्न झाले.
महिलांनी शेतीचा शोध लावला तेव्हा इतिहास सुद्धा त्या कल्पक होत्याच आणि आज सुद्धा आहेतच मात्र पुरुष सत्ताक पद्धतीत महिलांच्या कल्पकतेला तेवढे स्थान मिळाले नाही . आज देशभर बेटी बचाव बेटी पाढव चा नारा दिल्या जातो पण त्यांच्या शिक्षणा नंतर काय ? चूल आणि मुल ह्या व्यवस्थेला भेदण्यासाठी समाजात आज अनेक उपक्रम होत आहेत मात्र ग्रामीण त्याची आस अद्याप पोहोचली नाही तेव्हा महिलांच्या आर्थिक विश्वाला संपन्न करण्याकरिता तसेच लघु उद्योगाला चालना मिळण्याकरिता कारभारणी मंचाची स्थापना करण्यात आली. यामध्ये महिलांना स्वयंरोजगार, विविध उद्योगाचे प्रशिक्षण, मार्केटिंग स्किल, उद्योगासाठी कर्ज, तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. याचबरोबर महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी आरोग्य शिबिरे, सहली, विविध स्पर्धा असे बहुआयामी उपक्रम कारभारणी मंचतर्फे राबविण्यात येणार आहे.
महेश पवार हे फक्त याच कार्यक्रमापर्यंत मर्यादित राहत नाही तर स्वामिनी दारूबंदी आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहून त्यांनी यवतमाळ येथील महिलांची बाजू महाराष्ट्रासमोर मागील अनेक वर्षांपासून मांडली आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. नयना ठाकूर नगराध्यक्ष, प्रमुख पाहुणे हरीष ईथापे, नाम फाउंडेशन विदर्भ खानदेश प्रमुख तसेच एडवोकेट प्रीती मख, अनंतराव कटकोजवार, स्वामीनीचे संयोजक महेश पवार उपस्थित होते.
कारभारनी मंचाचे उद्घाटन हे अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाले ज्यात विविध क्षेत्रामध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या महिलांनी स्वतः कारभारनीच्या लोगोचे अनावरण केले. यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला शेतकरी , नगर परिषद सदस्य, परिचारिका, शिक्षिका, समाज संघटक, बचत गट सहयोगीनी, लघु उद्योजीका, सफाई कामगार, दुकानदार, भाजीविक्रेते , घरकाम करणाऱ्या स्त्रिया , अशा सर्व स्त्रियांचा समावेश होता .
कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पार करण्यात शितल कुरटकर समन्वयीका कारभारणी महिला मंच योगिता पवार, सोनाली भोयर, अंजली उमेकर, संगीता पडलवार, तुलसी भोरे, रोशनी गोडे, मंगला खांडरे, अर्चना जाधव न.प. सदस्य अर्चना तुरे उमा ठाकरे, कला पावडे, वनिता मायंदे, पुनम पवार, वर्षा उदार, पुष्पा गजभिये, वर्षा कोमावार, माधुरी ठाकरे, विना जाधव, शुभ्रा देशपांडे, नीता ढगले यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©