Breaking News यवतमाळ सामाजिक

*आज पासून आर्णी येथे कोरोणा लसीकरणाला सुरवात*

 

आर्णी/

जनतेस ज्या कोरोणा लसीची आतुरतेने वाट होती ती को- सिरम इन्स्टिटय़ूट ची को वॅक्सिंन लसीचा शुभारंभ आज ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे माजी विधानपरिषद आमदार खाँजा बेग यांचे हस्ते करण्यात आला.

कोरोणा लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे कोरोणा लसी चा पहिला डोस घेतल्या नंतर 28 दिवसा नंतर दुसरा डोस घेणे आहे,कोरोणा लस चार टप्प्यात देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात फ्रुन्ट लाईन वर्कर,डॉक्टर,नर्स, पोलीस,आशा सेविका,सफाई कामगार यांना ही लस देण्यात येणार आहे,गरोदर महिलांना,हार्ट ,बीपी किंवा इतर दुर्धर आजार असणाऱ्यांना ही लस देत येणार नाही तसेच करोना पोसिटीव्ह रुग्णांना 30 दिवसा नंतर लस देता येऊ शकते असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे,

दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षा वरील नागरिक यांना लस देण्यात येईल तिसऱ्या टप्प्यात समस्त नागरिक चवथ्या टप्प्यात उर्वरित नागरिकांना लस देण्यात येईल.केंद्र सरकारच्या कोवीण या अँप वर नोंदणी करन्यात येईल त्या नंतर लस देता येते.

लसीकरण झालेल्या रुग्णांना हलकी ताप येणे,डोके दुखणे या सारखे लक्षण दिसू शकतात या मूळे लसीकरण झालेल्या रुग्णांना सोबत pyrasitmol च्या दोन टॅबलेट देण्यात येणार आहे.

आज आर्णी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर स्वप्नील सतुरवार यांनी पहिली कोरोणा लस घेतली.१५० कोरोणा योध्याना आज लस देण्यात येणार आहे ,कोणत्या ही अफवांवर जनतेने विश्वास ठेऊ नये कोरोणा लस सुरक्षित असल्याचे डॉक्टर स्वप्नील सततुरवार यांनी सांगितले.

या वेळी सिव्हिल सर्जन वारे मॅडम ,वैद्यकीय अधिकारी सुनील भवरे, पोलीस निरीक्षक पितांबर जाधव,डॉक्टर राम पद्ममावर ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय स्टाफ पत्रकार बांधव नागरिक उपस्थित होते.

Copyright ©