यवतमाळ राजकीय

आरक्षण सोडतीवेळी उपस्थित अधिकारी, मान्यवर सरपंच ठरले… आता प्रतिक्षा महिला आरक्षणाची!

बाभूळगाव:- तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या सन २०२०  ते २०२५ सरपंच पदाकरिता अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गाकरिता आज दि. ०२ रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समिती सभागृह येथे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये अनुसुचित जाती साठी ५, अनुसूचित जमातीसाठी ८, ना.मा.प्र.साठी १७ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 34 अष्या एकुण ६४ ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहिर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विठ्ठल कुमरे, नायब तहसिलदार निवडणूक श्रीधर पांडे, गटविकास अधिकारी राजेंद्र घोंगडे, पंचायत समिती माजी उपसभापती तथा सदस्य हेमंत ठाकरे,निवडणूक लिपीक चंद्रकांत विलायतकर, गोपाल कावलकर आदिंच्या उपस्थितीत प्रक्रीया पार पडली. सरपंच पदाचे आरक्षण निघाले असले तरी महिला राखीव जागेंसाठी आरक्षणाची प्रतिक्षा असल्याने इच्छुकांमध्ये अजुनही कही खुशी कही गम असे वातावरण दिसुन आले.
तालुक्यातील एकुण ६४ ग्राम पंचायतींपैकी ९ ग्राम पंचायतींची निवडणूक याआधीच झाली होती. परंतु सरपंच पदाचे आरक्षण एकत्रितरित्या निघाले, त्यानुसार अनुसुचित जातीसाठी ५ ग्रामपंचायती ठरविण्यात आल्या, त्यापैकी २ महिला राखीव राहणार आहेत. अनुसुचित जातीसाठी आरक्षण निघालेल्या ग्राम पंचायतीमध्ये कोठा(अलिपूर), दिघी-१, कोपरा-१, चिमणापूर, माहुली यांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीच्या ८ ग्रामपंचायतीमध्ये ४ महिलांसाठी राखीव राहणार आहेत. यामध्ये दिघी-२, नांदेसावंगी, डेहणी, फत्तेपूर, पिंपळखुटा, दाभा, नांदुरा खुर्द, वेणी यांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या १७ ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आले त्यापैकी ९ ह्या महिलांसाठी राखीव राहणार आहेत. १७ ग्रामपंचायतींमध्ये सारफळी, परसोडी, पंचगव्हाण, बोरगाव, खडकसावंगा, मादणी, यावली, टाकळगाव, शिंदी, कोटंबा, गणोरी, देवगाव, सरूळ, पाचखेड, नांदुरा बु., राणी अमरावती, आलेगाव यांचा समावेश आहे. तर उर्वरीत ३४ ग्राम पंचायतींचे ह्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून त्यापैकी १७ ह्या महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामध्ये खर्डा, पिंपरी इजारा, विरखेड, महंमदपूर, उमरी, भटमार्ग, नागरगाव, आसेगाव देवी, वाटखेड खुर्द, सुकळी, चोंढी, तांभा, यरंडगाव, मिटणापूर, सावर, कोंढा, करळगाव, गळव्हा, वाटखेड बु., घारफळ, गिमोणा, पहूर, सावंगी मांग, मालापूर, नायगांव, कोपरा जानकर, वरूड, मुबारकपूर, फाळेगाव, गवंडी, गोंधळी, बारड पुनर्वसन, आष्टारामपूर, लोणी या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. यावेळी संदीप केळतकर, राजेश हुकरे, संदीप पाल, गणपत आत्राम, विजय गोखे, विलास चैधरी, नामदेव वाढई, अविनाश पोपळकर, चंद्रकांत हेडावु आदिंसह तालुक्याती ग्राम पंचायतीमंधून निवडून आलेले उमेदवार व गावकरी उपस्थित होते.

Copyright ©