Breaking News यवतमाळ सामाजिक

*दिन दुबळ्याचा देवदूत बनला अमन* *देवाने धाडला गरिबांचा देवदूत*

 

 

 

रोहिलेबाबा झोपडपट्टीत आगीने बेघर झालेल्या बांधवांसाठी भाई अमन आले देवदूत बनुन जातीने मुस्लिम कर्तव्याने दानशूरअसाही असाहीमानवाचा देवदूतभाईअमन खरा मानव सेवेचे व्रत जोपासत भुकेल्याले अन्न, तहानलेल्या पाणी बे घर झालेल्यांना छत देणारा यवतमाळातील दानव हे वेक्ती मत्व कोरोणा काळापासून सतत अविरत सेवेत आहे आज त्यांनी

निवारा बांधण्यासाठी 3 बेघरांना दिली टिनाची मदत, संपूर्ण देशात कोरोना संसर्ग महामारीने थैमान घातले आहे. तेव्हा पासून यवतमाळ जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीमत्व असलेले भाई अमन ङ्ग्रेन्ड्स ग्रुप यवतमाळ ने सर्व सामन्यांसाठी मदतीचा हाथ म्हणून धान्य किट, मास्क, सैनिटाईजर, रुग्णांना औषधी, रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण, ङ्गळ, ड्रायङ्गुट आदिंचे वितरण करुन आपले सेवा व्रत अवरितपणे सुरु ठेवले असतांनाच दोन दिवसा पुर्वी राहिले बाबा झोपडपट्टीत गॅस सिलेंडर स्फोटांनी 3 कुटूंब बेघर झाले होते. प्रशासनाने त्या परिवारांना फक्त 1000 रु. आर्थिक मदत करुन घरे अतिक्रमणात असल्यामुळे शासनातर्फे दुसरी कुठलिही मदत करु शकत नसल्याचे सांगितले तेव्हा त्या बेघरांनी देवदूतानी धाव घेऊन भाई अमन नरसिंघानी यांचे घर गाठुन आपली व्यथा सांगितली. तेव्हा भाई अमन यांनी क्षणाचाही विलंब न करता 3 बेघरांना प्रत्येकी 10 – 10 टिनाची प्राथमिक देण्याचे अभिवचन देऊन आज दुपारी 1.30 वाजता यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे, न. प. चे मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ, भाई अमन फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांनी आगीने उघड्यावर पडलेल्या कुटूंबातील संध्या पराते, लता कावळे, ज्ञानेश्‍वर ठाकरे यांना तातडीने टिनाची मदत उपलब्ध करुन दिली. याबद्दल यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी भाई अमन यांच्या सेवाभावी कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा करुन आभार व्यक्त केले तर न. प. चे मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ यांनी आगीने निछत्र झालेल्या कुटूंबाला भाई अमन यांनी केलेली मदत प्रशंसनीय कार्य असून त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल मुक्तकंठाने प्रशंसा केली तर भाई अमन यांनी सर्व सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी यवतमाळ करांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी सैय्यद मतीन, उपाध्यक्ष , शेख नाजिम, मोनू डॉन आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©