महाराष्ट्र सामाजिक

पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाचा मुंबई स्नेह मेळावा, हळदी कुंकू समारंभ, व समाज कल्याण केंद्राचा लोकोर्पण सोहळा

 

मुंबई प्रतिनिधी ०१ फेब्रुवारी – रोजी मुंबई याठिकाणी पश्चिम विभागीय मंडळाचा समाजिक मेळावा, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अथक प्रयत्नाने कांदिवली चारकोप सेक्टर ९ रवी टॉवर, म्हाडा बिल्डिंगच्या मागे, श्री स्वामी समर्थ मठाच्या बाजूला, रविवारी ३१ जानेवारी २०२१ रोजी पश्चिम विभागीय मंडळाचा समाज कल्याण केंद्राचा लोकार्पण सोहळा, स्नेह मेळावा, व हळदी कुंकू सोहळा भव्य स्वरूपात पार पडला.

याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी यांनी गवळी समाजाला उद्देशून मार्गदर्शन करताना सांगितले गवळी समाज केंद्राचा उपयोग तळागाळातील समाज बांधवांना झाला पाहिजे ही जबाबदारी मंडळाची असणार आहे, याप्रसंगी खासदार गोपाल शेट्टी, आमदार सुनिल राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, वार्ड क्रमांक २० विधानसभा चारकोप अध्यक्ष बाळा तावडे, गवळी समाजाचे समाजसेवक चंद्रकांत भोजने, अविनाश कांबळे, महाराष्ट्र गवळी संघटना अध्यक्ष हिरामणआप्पा गवळी, गवळी सेवा फाउंडेशन संस्थापक दिनेश भोजने, एक हात वात्सल्य NGO संस्थापिका सौ दिक्षाताई भोजने, आनंदराव खराडे, नगरसेविका प्रियंका मोरे, मंडाळाचे अध्यक्ष अनंत भालेराव तसेच गवळी समाजातील महाराष्ट्रातील व मुंबईतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष अनंत भालेकर, वासुदेव घोले व सर्व महिला पदाधिकारी, पुरूष पदाधिकारी याची कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे नियोजन करून गवळी समाजा समोर एक चांगला आदर्श ठेवला.

Copyright ©