यवतमाळ सामाजिक

सिलिंडर स्फोटात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी गुरुदेव युवा संघाचे जिल्हाधिका-यांना निवेदन

जिल्हाधिका-यांनी दिले मदतीचे आश्वासन
यवतमाळ : पिंपळगाव येथील झोपडपट्टी परिसरात सिलिंडरच्या स्फोटामुळे चार घरे जळुन खाक झाली. या घटनेतील बाधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गुरुदेव युवा संघाने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले.
शहरातील पिंपळगाव येथे एका घरात गॅस सिलिंडर लीक झाल्याने आग लागली होती. या आगीत योगेश ज्ञानेश्वर ठाकरे, संध्या महादेव पराते, लताबाई कवडे, अरुणा तुळशिराम धुर्वे यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. गॅस कंपनीकडून लिडिंर कनेक्शन देताना गॅसचा विमा काढण्यात येतो. प्रशासनासह गॅस कंपनीने घटनास्थळाचा पंचनामा करून बाधितांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची भेट घेवून घटनेची माहिती दिली असून, आर्थीक मदत देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिका-यांनी शासनाकडून मदत करण्याचे आश्वान दिले. तसेच तहसीलदार सचिन झाल्टे यानीही मदत करण्याचे आश्वासन दिले. निवेदनावर संध्या पराते, ज्ञानेश्वर ठाकरे, लताबाई कावरे, तुळशिराम धुर्वे यांच्या सह्या आहेत.

Copyright ©