• सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलतर्फे सर्वोच्च `प्लॅटिनम’ दर्जा
• नागपूर मेट्रोच्या एकूण १३ मेट्रो स्टेशनला आयजीबीसीचा सर्वोच्च `प्लॅटिनम’ दर्जा
*नागपूर, २८ ऑक्टोबर:* गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे टप्पे गाठणाऱ्या महा मेट्रो नागपूरने आणखी एक मजल मारली आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या पूर्व – पश्चिम उत्तर दक्षिण मार्गिकेच्या केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) संस्थेतर्फे प्लॅटिनम श्रेणी हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. सिताबर्डी इंटरचेंज निर्माण करताना याच्या संकल्पनेत आणि बांधकामात पर्यावरण संवर्धंनासंबंधी अनेक महत्वाचे पैलू अंगीकृत केल्याने या इमारतीला हा दर्जा प्राप्त झाला आहे.
अत्याधुनिक सुविधांनी युक्त *’एल’* आकाराचे सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन पाच मजली जंक्शन असून पहिल्या मजल्यावर तिकीट काउंटर,दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो गाड्यांसाठी प्लॅटफार्म व्यवस्था आहे. तसेच या ठिकाणी ऑपरेशन सेंटर असून या ठिकाणावरून गाड्यांचे नियंत्रण होते. या ठिकाणाहून सध्या स्थितीत पश्चिम आणि दक्षिण दिशेने मेट्रो जात असून लवकरच पूर्व आणि उत्तर दिशेने मेट्रोचा प्रवास नागरिकांकरिता उपलब्ध होईल.
संपूर्ण प्रकल्प पर्यावरण पूरक असावा ही संकल्पना महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांची होती. म्हणूनच या आधी महा मेट्रो नागपूरच्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील खापरी, न्यू एयरपोर्ट, एयरपोर्ट साऊथ,एयरपोर्ट,जय प्रकाश नगर,रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन व ऍक्वा लाईन मार्गिकेवरील लोकमान्य नगर,बंसी नगर,वासुदेव नगर,सुभाष नगर,इंस्टीटयुट ऑफ इंजिनियर्स, झासी राणी चौक मेट्रो स्थानकांना आयजीबीसी कडून प्लॅटिनम दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच नुकतेच मेट्रो भवनला देखील आयजीबीसी कडून प्लॅटिनम दर्जा प्राप्त झाला आहे.
*सौर उर्जेची निर्मिती:* सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे घटक म्हणजे स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात केलेला सौर ऊर्जेचा वापर. २०० kWp क्षमतेचे सौर ऊर्जेची प्रणाली इथे स्थापित केली असून यातून वर्षा काठी २.७ लाख घटक ऊर्जा निर्मित होईल. महत्वाचे म्हणजे या इमारतीच्या एकूण आवश्यकते पैकी जवळपास ५०% पर्यंत ऊर्जा या सौर प्रणालीच्या माध्यमातून मिळेल.
*रेन वॉटर हार्वेस्टिंग:* रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था असल्याने स्टेशनच्या छतावर आणि परिसरात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा १०० % पाण्याचा पुनर्वापर होतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती अवलंबल्याने पाणी कमी लागते.
*सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन सर्व सुविधाने सुसज:* (१.) प्रवाश्याना चढणे आणि उतरण्यासाठी पायऱ्या, एस्केलेटर व्यवस्था यामुळे ग्राउंड फ़्लोअर ते कॉनकोर्स आणि कॉनकोर्स ते प्लॅटफॉर्मवर दरम्यान चढणे किंवा उतरणे सहज शक्य, (२.) दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा,(३) अखंड वीज पुरवठा,४) कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी घोषणा प्रणाली, (५.) दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, (६.) लहान मुलांच्या देखरेखीकरता स्वतंत्र खोली (बेबी केयर रूम), (७.) कॉन्कोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, (८.) संपूर्ण स्टेशन सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सोयी सुविधा प्रवाश्याकरता करण्यात आल्या आहे.
सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन रेल्वे स्टेशन, विमानतळ तसेच इतर शहराना जोडणारे बस स्थानक इतर वाहतूक साधनाने जोडण्यात आले आहे याशिवाय स्टेशन परिसरात फीडर बस सेवा, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, पार्किंग, सायकल पार्किंग आणि इतर बर्याच गोष्टी सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा या ठिकाणी प्रदान करते.
Add Comment