यवतमाळ राजकीय सामाजिक

*एका मृत्युससह जिल्ह्यात 68 जण पॉझेटिव्ह 77 जण कोरोनामुक्त* *2 फेब्रुवारी रोजी सरपंचपदासाठी तर 4 फेब्रुवारी रोजी* *महिला सरपंचपदासाठी आरक्षण सोडत*

 

यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 68 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ तालुक्यातील 69 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 77 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 487 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 68 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 419 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 468 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14375 झाली आहे. 24 तासात 77 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13481 आहे. तर जिल्ह्यात एकूण 426 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 142253 नमुने पाठविले असून यापैकी 141987 प्राप्त तर 275 अप्राप्त आहेत. तसेच 127603 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य व

_______________________

*2 फेब्रुवारी रोजी सरपंचपदासाठी, तर 4 फेब्रुवारी रोजी*

 

*महिला सरपंचपदासाठी आरक्षण सोडत*

 

यवतमाळ, दि. 30 : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम ३० ( ४ ) ( ५ ) अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदी नुसार सन २०२० ते २०२५ दरम्यान यवतमाळ जिल्हयातील मुदत संपणा – या ग्राम पंचायतीच्या निवडणूकीव्दारे गठीत होणा – या ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. यवतमाळ जिल्हयात ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी तहसील स्तरावर तहसिलदार यांनी नेमुन दिलेले आरक्षण पदसंख्येच्या प्रमाणात अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती पदाकरिता सरपंचाची पदे नियम ५ नुसार आदेशाव्दारे नेमुण द्यावयाची आहे. तसेच संबंधित तालुक्यातील नेमुण दिलेले आरक्षित पद संख्येच्या प्रमाणात नागरिकांचा मागास प्रवर्गा करीताच्या पदाकरिता सरपंचाची पदे नियम ६ अन्वये तहसील स्तरावर तहसीलदार यांनी सोडत पध्दतीने राखून ठेवण्यासाठी दिनांक ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी सोडत घेवून आदेशाव्दारे नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाकरिता ची पदे राखून ठेवावयाची कार्यवाही करावी.

 

शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे सर्व तहसीलदारांनी किमान तीन दिवस अगोदर सरपंचाची पदे आरक्षित करण्याबाबतची सुचना संबंधित ग्राम पंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्याची दक्षता घ्यावी. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करतांना सन २०११ चे जनगणनेची अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती ची लोकसंख्या विचारात घ्यावी. तथापि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम ३० ( ५ ) अन्वये आणि नियम ५ व ६ चे परंतुक विचारात घेवुन तहसील स्तरावर आळीपाळीने पदे आरक्षित करण्याची दक्षता घ्यावी. अनुसूचित क्षेत्रातील समाविष्ठ होणा – या ग्रामपंचायतीकरीता सरपंच पदाचे आरक्षण संबंधित तहसिलदार यांनी कलम ३० ( ४ ) ( अ ) च्या परंतुका नंतर निर्धारित करण्याची दक्षता घ्यावी.

 

ग्रामपंचायतनिहाय सरपंच पदाचे आरक्षण सभा आयोजित करतांना कोविड -१ ९ घ्या सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत पुर्नवसन विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्य विषयी सुचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता होण्याबाबत कटाक्षाने काळजी घेण्यात यावी.

 

सर्व तहसीलदारांनी ०३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता सरपंच पदाच्या आरक्षणाची नामावली, आरक्षणाचे आदेश, सोडतीचे इतिवृताची प्रत संबंधित निवडणूक नायब तहसीलदार यांचे हस्ते या कार्यालयात सादर करावी. आरक्षण सभेसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार निवडणुक व ग्राम पंचायत निवडणुक लिपीक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बळीराजा चेतना भवन, यवतमाळ येथे दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी न चुकता उपस्थित राहावे.

 

अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग अंतर्गत स्त्रियांकरिता व खुल्या प्रवर्गातील स्त्रियाकरिता आरक्षणची सोडत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बळीराजा चेतना भवन, यवतमाळ येथे आयोजित केली आहे, असे प्रभारी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगिता राठोड यांनी कळविले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©