यवतमाळ सामाजिक

*सिलेंडर ब्लास्ट मधील प्रभावित कुटूंबांना गुरुदेव सेवा संघाने दिला आधार*

 

 

यवतमाळ -३०

शहरातील पिंपळगाव परिसरात दुपारी 2.00 वा. चे दरम्यान संध्या पराते यांचे घरी अचानक स्वयंपाकाचे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट एवढा भयानक होता की, लगतच्या घरातही आग लागून सिलेंडर ब्लास्ट झाले. यात ज्ञानेश्वर ठाकरे, लता कावरे, तुळशीराम धुर्वे, चंद्रकला तळवाढकर, अरुणा धुर्वे यांच्या घराचे नुकसान झाले. घरातील कपडे, रोकडे, अन्न धान्य, महत्वाची कागदपत्रे आगीच्या भस्मस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच शहर विभागातील तलाठी तसेच पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या घटनेचे वृत्त कळताच गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी घटनास्थळी जावून प्रभावित कुटूंबाचे सांत्वन केले व यथाशक्ती मदत करण्याचे तसेच शासन दरबारी त्यांची कैफियत मांडून शासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गुरुदेव युवा संघाच्या या कार्याबद्दल त्यांचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©