यवतमाळ सामाजिक

*प्रजासत्ताक दिनानिमित्त गोळा झालेले राष्ट्रध्वज शासनाला सुपूर्द !*________*श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी ‘ईशनिंदा* *विरोधी’कायदा बनवावा !*हिंदू जनजागृती समितीचे केंद्रीय गृहमंत्री आणि*कायदामंत्री यांना निवेदन !*

 

 

 

हिंदू जनजागृती समितीच्या

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहिमेला जिल्ह्यातुन उस्फुर्त प्रतिसाद !

यवतमाळ – हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली. त्याला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेमध्ये समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी तसेच शाळा यांना एकूण २९ निवेदने देण्यात आली. जिल्हाधिकारी साहेब यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेत वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा, यासाठी नागरिकांना आव्हान केले. समितीच्यावतीने सोशल मीडियाद्वारे सुद्धा व्यापक प्रमाणात जनजागृती करून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच ध्वजविक्रेते यांचे सुद्धा प्रबोधन करण्यात आले. २६ जानेवारी या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये ‘राष्ट्रध्वज सन्मान पेटी’ फिरवण्यात आली, त्यामध्ये खराब झालेले, खाली पडलेले, नागरिकांनी दिलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यात आले. हे गोळा झालेले राष्ट्रध्वज ध्वजसंहीतेनुसार विसर्जन करण्याकरिता दिनांक २८ जानेवारीला उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना सुपूर्द करण्यात आले. ही मोहीम यवतमाळ शहरासह वनी, पुसद,नेर, दारव्हा, कारंजा शहरांमध्ये राबवण्यात आली.

 

 

दिनांक 30

*श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी ‘ईशनिंदा* *विरोधी’कायदा बनवावा !*हिंदू जनजागृती समितीचे केंद्रीय गृहमंत्री आणि*कायदामंत्री यांना निवेदन !*

 

 

यवतमाळ – सर्वसाधारण भारतीय समाज हा सश्रद्ध आणि आस्तिक आहे. भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धास्थानाचा आदर करण्याचे सूचित करते. मात्र आज नाटके, चित्रपट, वेब सिरीज,चित्रे, विज्ञापने, काव्ये आदीद्वारे धर्म,धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची मोठ्या प्रमाणात विटंबना केली जात आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य, कलास्वातंत्र्य, नास्तिकवाद आदींच्या नावाखाली देवतांची टिंगल करणे,देवतांना अयोग्यप्रकारे रेखाटणे, सोशल मीडियाद्वारे देवतांचे अवमानकारक चित्रे प्रसारित करणे, वेब सिरीज, चित्रपट,नाटके, विज्ञापन याद्वारे विनोदी आक्षेपार्ह संवाद दाखवणे, देवतांची टिंगल करणे तसेच देवतांविषयी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन विकृत आणि विद्वेषी लिखाण करणे, आदी अनेक माध्यमातून देवतांचे विडंबन सर्रासपणे होत आहे, त्यामुळे बहुसंख्य अस्तिक सश्रद्ध हिंदू समाजामध्ये असंतोष पसरला जात आहे. काही नागरिकांची देवा धर्मावरील श्रद्धा अल्प होऊ शकते, किंवा त्यांच्या श्रद्धेला तडा जाऊन धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. वारंवार अशा प्रकरणांमध्ये शासन किंवा पोलीस यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, पुन्हा पुन्हा अशा घटना घडतच आहे. आता पुन्हा हा विषय ऐरणीवर येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या वादग्रस्त ठरलेली तांडव ही वेब सिरीज आणि अशा वेब सिरीज चे सर्रास प्रसारण करणारा ‘ॲमेझॉन प्राईम’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म. हिंदूधर्मा व्यतिरिक्त अन्य धर्मीय याबाबत अत्यंत जागरूक असल्याने त्यांच्याबाबत असे घडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, जरी काही झालेच तर पोलीस लगेच दखल घेतात; मात्र हिंदूंच्या बाबत कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या जातात हे अत्यंत गंभीर आहे.

राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी अन्य कोणाच्या भावना न दुखावण्याची मर्यादाही संविधान कर्त्यांनी घालून दिलेली आहे. आज कायद्याचा धाक नसल्याने अनेक जण देवतांचे विडंबन करण्याचे धजावत. त्यामुळे लवकरात लवकर केंद्र शासनाने नाटके, चित्रपट, विज्ञापने,वेब सिरीज, काव्य, व्याख्याने,लेखन, चित्रे आदीद्वारे होणारे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ‘ईशनिंदा विरोधी कायदा’ बनवावा आणि केवळ संबंधितांविरुद्धच नव्हे, तर त्याचे प्रसारण करनाऱ्यांवरही कठोर कारवाईची तरतूद कायद्यामध्ये करावी, या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शहा आणि केंद्रीय कायदा मंत्री मा.रविशंकर प्रसाद यांना उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे यांच्यामार्फत 28 जानेवारी ला पाठवण्यात आले. निवेदन देतांना हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय फोकमारे, प्रशांत सोळंके, धर्मप्रेमी मंगेश साखरकर, धीरज गव्हांडे उपस्थित होते.

Copyright ©