यवतमाळ सामाजिक

*महागाव तहसील कार्यालया समोर महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन* 

 

महागाव ,उमरखेड – प्रतिनिधी प्रशांत देशमुख मो.7775884968

 

उमरखेड येथील नायब तहसिलदार व तळाठी यांच्यावर रेती माफिया कडून 23जानेवारी रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणी साठी महागाव तहसील कार्यालयासमोर तहसीलदार व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे महागाव तहसील कार्यालया समोर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार , महसूल कर्मचारी, मंडळाधिकारी, तलाठी, कोतवाल संघटनानी 27 जानेवारी रोजी पासून काम बंद आंदोलन सुरू केले असून उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोषे यांच्यावर 23 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता रेती माफिया कडून चाकूने प्राणघातक वार करून गंभीर जखमी करून हलाकरण्यात आला होता या घटनेतील आरोपींना पोलिसांनी आजपर्यंत संबंधित रेती माफियास अटक करण्यात आली नाही त्यामुळे जोपर्यंत हलेखोर रेती माफियास अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरु राहील अशी महसूल कर्मचारी संघटनेची मागणी आहे .

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©