Breaking News यवतमाळ सामाजिक

*वीज बिल कमी न केल्यास आंदोलन करणार*____ *गुरुदेव युवा संघाचा आंदोलनाचा इशारा*

 

 

यवतमाळ : २९

मागील वर्षाच्या तुलनेत वीज दरात वीज वितरण कंपनीने भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. ग्राहकांना जास्त रक्कमेचे वीज बिल देण्यात आले असून, ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. नवीन वीज जोडणी करीता सर्व सुचनांचे पालन करून जोडणी करून देण्यात आली नाही. या संदर्भात संबंधित अधिका-यांना विचारणा केल्यास सद्या मिटर नसल्याचे सांगण्यात आले. लॉकडाउनच्या काळातील वीज बील माफ करण्याचे आश्वासन विजमंत्र्याने आश्वासन दिले होते. मात्र त्यांचे आश्वासन हवेत विरले. वीज बिल कमी करावे, वीज जोडणी करावी अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली आहे. या बाबतचे निवेदनही जिल्हाधिका-यांना दिले आहे. सात दिवसाच्या आत मागण्या पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Copyright ©