यवतमाळ राजकीय

* फॉउंडेशन द्वारा ग्रामपंचायत सदस्याना दिले नेतृत्व व गाव विकास योजने चे प्रक्षिक्षण*

 

 

रिलायन्स फॉउंडेशन,यवतमाळ अतर्गत भाम राजा येथे नवीन निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नेतुत्व विकास व पंचायत राज या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

नवीन सदस्यांना आपले अधिकार आणि कर्तव्य ,ग्रामसभा, मासिक सभा, याचे महत्व ,त्याला असणारी उपस्थिती विकासाच्या योजना तसेच ग्रामपंचायतीचा कारभार कसा करावा, आदर्श ग्रामपंचायत संकल्पना,या विषयावर रिलायन्स फॉउंडेशन द्वारे गाव पातळीवर ग्राम पंचायतिच्या सर्व नवीन सदस्यां साठी प्रशिक्षण देण्यात आले, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, लसीकरण आणि अनेक राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी भर दिला. या प्रशिक्षण सत्रामध्ये ते अधिकाऱ्याशी संवाद साधतील अशी माहिती देण्यात आली, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थींना गावे आणि समुदायांच्या विकासात स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेची आणि विकास योजनांची माहिती, तसेच कार्यक्रमांचे, पंचायतीचे स्रोत आणि त्यांचा उपयोग याबद्दल माहिती दिली.यवतमाळ तालुक्यातील तीन ग्राम पंचायत ला नेतुत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले सर्वाना मास्क, देऊन कोरोना आजारा बद्दल आरोग्याची काळजी घेण्याबाबत माहिती देण्यात आली.या प्रक्षिकणाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायत सदस्यांचा नेतृत्व विकास करून गाव विकास योजना मध्ये जागरूक करणे तसेच नुकतेच निवडून आलेल्या सदस्याच्या क्षमतांमध्ये बरेच कार्य केले जाईल आणि त्यांची भूमिका व जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत होईल हा होता.

या प्रक्षिक्षणा मध्ये रिलायन्स फॉउंडेशनच्या सि.आर.पी. किरण येरमे उपस्थित होत्या.

Copyright ©