Breaking News यवतमाळ राजकीय सामाजिक

*गरीब,अनाथ ,वृद्धांना ब्लॅंकेट लहान मुलांना खाऊचा वाटप !* ग्राहक प्रहार संघटना व चांगुलपणा चळवळीचा स्तुत्य उपक्रम

 

 

पांढरकवडा :-

दिनांक 26/

रोजी खैरगाव दे येथे नागोराव नैताम ह्यांचे घराचे प्रगणात ग्राहक प्रहार संघटना व चांगुलपणा चळवळीचा स्तुत्य उपक्रम 26 जाने निमित्य अरुणाजी पुरोहीत नागपूर ह्यांचे आजोबाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आला ! कार्यक्रमाचे अध्यक्ष नागोराव नैताम होते ,व्यासपीठावर माजी तहसीलदार तथा ग्राहक प्रहार संघटनेचे सल्लागार हनुमंत रजनलवार,माजी तहसीलदार तथा ग्राहक प्रहार संघटनेचे सहसचिव भैय्यासाहेब ठमके होते ,ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव तथा यवतमाळ चगुलपणा चळवळीचे प्रसाद नावलेकर,माजी पंचायत समिती सभापती बळवंत नैताम,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक देशट्टीवार, जेष्ठ नागरिक नागोराव मलेलवार आदी होते !

कार्यक्रमाची पाश्वभूमी तथा प्रास्ताविक प्रसाद नावलेकर ह्यांनी करतांना सांगितले ,राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे चांगुळपणाची चळवळ देशात चालवीत असून महाराष्ट्राच्या संयोजिका अरुणा पुरोहीत नागपूर ह्या असून त्यांनी गरीब,अनाथ ,वृद्धांना ब्लॅंकेट लहान मुलांना खाऊ वाटप कार्यक्रम तुमच्या भागात घ्या असे सुचविले त्या करीता साहित्य पाठविले ,खैरगाव हे गाव संघटीत कार्य करीत आहे तालुक्यात कमी पोलीस केसेस ह्या गावच्या आहेत चागुलपणा असलेली नागोरावजी नैताम सारखी अनेक माणसं ह्या म्हणून आम्ही ह्या गावात हा उपक्रम राबवित आहे !

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 25 ब्लॅंकेट व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले त्यावेळेस मुलं व लाभार्थी समाधान ,आनंद व्यक्त करतांना दिसत होते .

अध्यक्षीय भाषण करतांना नागोराव नैताम म्हणाले ,कोणतीही अपेक्षा ठेवता जे दिल जात त्याच मोल ठरविता येते नाही ते अनमोल असत असे सांगून ग्राहक प्रहार संघटना व चांगुलपणाच्या चळवळीचे त्यांनी कौतुक केले !

संचलन सचिन बोरतवार ह्यांनी केले ,आभार रुपेश वाघाडे ह्यांनी मानले लाभार्थी तथा लहान मुलं तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते

Copyright ©