Breaking News यवतमाळ सामाजिक

*यवतमाळात शल्य चिकित्सकासह इतर डॉक्टरांनी घेतली लस*  *जिल्ह्यात नव्याने चार ठिकाणी लसीकरण केंद्र* *जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त*

 

 

यवतमाळ, दि. 27 :

यवतमाळ जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीला जिल्ह्यातील पाच ठिकाणी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. आजपासून आणखी चार ठिकाणी लसीकरण मोहीम सुरु झाली असून जिल्ह्यात आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे एकूण नऊ केद्र झाले आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहरात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह इतर डॉक्टरांनी कोरोनाची लस घेतली.

 

आजपासून सुरु झालेल्या केंद्रामध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालय, यवतमाळ शहरातील पाटीपूरा येथील नागरी आरोग्य केंद्र तसेच यवतमाळ शहरातील क्रिटीकेअर हॉस्पीटलचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी नागरी आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेवून नवीन केंद्राच्या लसीकरणाची सुरुवात केली. त्यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर आणि डॉ. भारती, डॉ. चव्हाण, डॉ. दीपक अग्रवाल यांनी सुध्दा लस घेतली.

 

यावेळी डॉ. दिलीप देशमुख, डॉ. सचिन बेले यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते. राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आ. डॉ. अशोक ऊईके यांच्याहस्ते लसीकरणाचे उद्घाटन झाले. या मोहीमेकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदींचे सहकार्य लाभले. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी विविध टप्प्याक्रमाने नागरिकांनी सामोर यावे. तसेच दैनंदिन मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे

 

 

जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त“

 

यवतमाळ, दि. 27 :

गत 24 तासात जिल्ह्यात 41 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 38 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 563 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 41 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 522 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 429 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14155 झाली आहे. 24 तासात 38 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13301 आहे. तर जिल्ह्यात एकूण 425 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 139994 नमुने पाठविले असून यापैकी 139604 प्राप्त तर 390 अप्राप्त आहेत. तसेच 125449 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Copyright ©