यवतमाळ सामाजिक

*दूर्लक्षित ऐतिहासिक विजय स्तंभ आमच्या स्वाधीन करा :-*

मनोज गेडाम अध्यक्ष गुरुदेव सेवा संघ

यवतमाळ:

यवतमाळ शहरातील मध्यवस्तीत असलेल्या आझाद मैदान परिसरात ऐतिहासिक विजय स्तंभ असून त्या विजयस्तंभाची देखभाल करणारे प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असून हे विजयस्तंभ केर कच-यात दुःखात पडले होते धूळ खात पडले होते. दूर्लक्षित ऐतिहासिक जयस्तंभाची गुरुदेव सेवा संघाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली रंगरंगोटी करण्यात आली व तिथे 26 जनवरी प्रजासत्ताक दिन पर्वावर मागणी करण्यात आली कि वर्षानुवर्ष याच प्रमाणे जर या विजयस्तंभाचे हाल होत असेल तर व प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत असेल तर या विजयस्तंभाला आमच्या स्वाधीन करा आम्ही त्याची देखभाल करू असे माननीय जिल्हाधिकारी यांना गुरुदेव सेवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी निवेदन केले आहे.

इतिहासिक आजाद मैदान विजयस्तंभ प्रजासत्ताक दिन निमीत्य गुरुदेव युवा संघाकडून 26 जानेवारीचा ऐतिहासिक साजरा करण्यात आला आजाद मैदान येथे स्वातंत्र्याच्या लढायचे रणशिंगे फूंकण्यात आली आहे. पुढीच्या पीढीला माहिती होण्याकरीता स्वातंत्र्याची येथील आजाद मैदान वर जयस्तंभ उभारण्यात आला होता. परंतु आज जयस्तंभांची दयनीय अवस्था होते आहे, परिसराला अस्वच्छतेचे गालबोट लागले आहे. यामुळे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम व त्यांचे कार्यकर्ता घेऊन 25 च्या रात्रीपासून जयस्तंभ परिसराची स्वच्छता केली व जयस्तंभ स्वच्छ पाण्याने धुतले व पसुन स्वच्छ करण्यात आले.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त विविध वेगळ्या-वेगळ्या तीन कलर मध्ये फुलांमध्ये विजयस्तंभ सजवण्यात आले. तीन कलर चे तोरण लावून मैदानाला रंगवण्यात आले जयस्तंभ रांगोळी काढून व फुगे लावून जयस्तंभाला सजविण्यात आले. यावेळी छोटे-छोटे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यामध्ये पार्लेजी व चॉकलेट वाटप करण्यात आले. भारत माता की जय भारत माता की जय असे नारे लावण्यात आले.

गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम व युवा संघाचे शहर प्रमुख समाधान रंगारी अपंग यांनी विजयस्तंभ याचे सजावटीचे काम हातात घेतले व पूर्ण केले. कार्यकर्त्यांना सोबत घेवून स्वातंत्र्याच्या आठवणिला उजळ देणा-या जयस्तंभ व परिसराची साफ-सफाई करून साजसज्जा केली.

यावेळी संदीप हातागळे, रोशन नागपुरे, सचिन वाकळे, निलेश नागपुरे, भाऊराव वासणी, पवन मडावी अनेक दिव्यांग युवा संघाचे कार्यकर्ता हजर होते. यावेळेस युवा गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी सकाळी 7.30 वाजता विजय जयस्तंभाला माल्यार्पण करूण स्वतंत्रता सैनिकांना अभिवादन केले.

गुरुदेव युवा संघ जाते गुरुदेव युवा संघा द्वारे विविध उपक्रम राबवुन गोरगरीबांचे प्रश्न व त्यांना मदत करीत आली आहे. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना कळकळीची विनंती केली आहे, आजाद मैदानवरील विजयस्तंभ परिसर स्वच्छ, सुंदर ठेवण्याकरीता विजयस्तंभाला आमच्या स्वाधीन करा आम्ही त्याची देखभाल करू. अश्या मागणीचे निवदेण्या देण्यात आले.

यावेळी समाधान रंगारी,सूरेखा हातागळे, सचिन हातागळे, छगन वाकोडे, रोशन नागपूरे, भावराव वासनिक, रामदास खोब्रागडे, भिमराव राठोड, महिंद्र यांची उपस्थिती होती.

Copyright ©