Breaking News यवतमाळ सामाजिक

*सावळी सदोबा येथे ग्रामीण पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी गठित……!*

 

“””””””””””””””””””””””””'”””””””””””””””””””””

सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा येथे आज दिनांक २६/१/२०२१ रोजी प्रजासत्ता दिनानिमित्त सर्वत्र पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन कृषी वैभव जिनिंग सावळी सदोबा येथे सभेचे आयोजन करण्यात आलेत, स्व.पीएलशिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघटनेचे संघटनाप्रमुख रामभाऊ पवार यांनी ग्रामपंचायत माळेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन संपूर्ण पॅनल निवडून आणण्यात मोलाची भुमिका बजावली,त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,व त्याच बरोबर सावळी सदोबा येथील नविन स्व.पीएलशिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणीची निवड जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके यांच्या आदेशावरून करण्यात आली,नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून,आसिफ खान (अध्यक्ष),रुपेश खरतडे (उपाध्यक्ष) सुरेश राठोड(सचिव) योगेश बुटले, (सहसचिव)प्रमोद भाऊ कोटावर (कोषाध्यक्ष) रामभाऊ पवार,दुर्गेश भाऊ कर्नेवार,राहुल भाऊ राऊत, अमिन चव्हाण,यांची निवड करण्यात आलीत,

कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद भाऊ कोटावर,सूत्रसंचालन रुपेश भाऊ खरतडे,तर सुरेश भाऊ राठोड यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवाचे आभार प्रदर्शन केले…..!

Copyright ©