यवतमाळ सामाजिक

*यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, र. न. 380 च्या प्रयत्नांना यश*

 

 

” यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी क्लासेस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाचा हिरवा कंदील ”

 

यवतमाळ:  मा. जिल्हाधिकारी  यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वर्ग ९ ते १२ चे खाजगी क्लासेस, नियम व अटींचे पालन करण्याच्या अधीन राहून सुरु करण्याची परवानगी दिली असून क्लास संचालकांचे गेले 10 महिने बंद असलेले क्लासेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, र. न. 380 सलग्न महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टिचर्स असोसिएश क्लासेस सुरु व्हावेत म्हणून सतत प्रयत्न करीत होती शेवटी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे अथक परिश्रम कामी आले

.कोरोणा व्हायरस मुळे १६ मार्च पासून यवतमाळ जिल्ह्याभरातील शिकवणी वर्ग बंद ठेवण्यात आल्यामुळे, शिकवणी वर्ग संचालक आर्थिक विवंचनेत सापडलेला होता.सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद असल्यामुळे शिकवणी वर्गाचे भाडे, घरभाडे, विजबिल, bank EMI, भरणे कठीण जात होते तसेच जिल्ह्यातील पालकांची नाजुक आर्थिक परिस्थिती आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळे online क्लासेस सुद्धा कुचकामी ठरलेले होते. ग्रामीण भागात ९०% पालक smartphone घेऊ शकत नाही. एखाद्या पालकांजळ फोन असते तर नेटवर्क नसते. Online क्लासेसमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे त्यामुळे पालक, विद्यर्थी आणि शिकवणी वर्ग संचालक, मागील 10 महिण्यापासून बंद असलेले क्लासेस सुरु होण्याची वाट बघत होते सदर बाब यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, र. न. 380 ने मा. जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार भेटून निदर्शनात आणून दिली. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी  शिकवणी वर्ग संचालकांची परिस्थिती लक्षात घेऊन शिकवणी वर्ग सुरु करण्याचे आदेश काढले त्याबद्दल यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, र. न. 380 कडून विदर्भ विभागीय अध्यक्ष, योगीराज अरसोड , जिल्हाध्यक्ष संजय पवार , मार्गदर्शक अनिल चिंचोळकर, उपाध्यक्ष शैलेश दुबे , सचिव योगेंद्र भुसे, संघटक मोहनशिंह शेर, संदीप देवपारे, चंद्रशेखर आष्टेकर,मार्गदर्शक राजकुमार राठी ,संदीप चिंतलवार ,आनंद विधाते, विकास वेनुरकर, राजेश खोडे, दिलीप घोडेराव, प्रदीप गुल्हाने, मधुकर लिहितकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. अस्मिता वैद्य, यवतमाळ शहर अध्यक्ष

सौ. भक्ती शेनमारे , यवतमाळ तहसील अध्यक्ष सौ. मेघा भास्करवार, सहसचिव सौ. वैशाली टोणे, सहसंघटक सौ. अंजली माटे, सहकोषाध्यक्ष सौ. विद्या नरहरशेट्टीवार, कायदेविषयक सल्लागार सौ. अँड. सीमा दुगड संजय गावंडे, एय्याज खान, वैभव गोळे , अमोल चेपे, डॉ. रविश खान, रविंद्र खोडे , दिनेश वडेरा, विनोद भोसले, हार्दिक मांडवीया, रमीज शेख, प्रवीण शेटे विवेक सुपारे , संतोष पंडागडे, चंदन गायकवाड, तहसील अध्यक्ष घाटंजी प्रविण वानखडे, राळेगाव मनोज येंडे, वणी कुंतलेश्वर तुरविले, कळंब सुजित गोरे, उमरखेड संतोष गुजर, दारव्हा उमेश जामदारकर , आर्णी महेंद्र चौधरी, नेर संतोष दारव्हटकर, दिग्रस : शेख अमर , मारेगाव नितीन काटकर, बाभूळगाव शब्बीर खान पांढरकवडा सागर लहामगे, यांनी मा. जिल्हाधिकारी साहेबांचे जाहीर आभार मानलेत.

Copyright ©