यवतमाळ सामाजिक

*शासकीय मदत न मिळाल्याने दिव्यांगांवर उपासमारीची पाळी*  *मागण्या मान्य न झाल्यास उपोषण* – मनोज गेडाम

 

 

यवतमाळ/२५

जिल्ह्यातील दिव्यांग जनतेला गेल्या ५ महिण्यापासून शासनातर्फे मिळणारे अनुदान मिळालेले नाही त्यामुळे दिव्यांग व्यक्तींवर उपासमारीची पाळी आली आहे . सोबतच एस.सी. , एस.टी. , ओबीसी , व्हीजेएनटी च्या निराधार लाभार्थ्यांना अद्यापपावेतो शासनाकडुन प्राप्त होणारी अनुदान मिळाले नाही या संदर्भात तहसील कार्यालयात चौकशी केली असता नीधी शिल्लक नाही असे उत्तर मिळाले . शहरातील अडत्या नाडत्या जनतेला न्याय मिळवून देण्याकरीता अहोरात्र परिश्रम घेणारे गुरुदेव युवा संघचे अध्यक्ष मनोज गेडाम यांना ही माहिती मिळताच त्यांनी दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी प्रतिकात्मक ठिय्या आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गौरकार यांना सादर केले . निराधरांना व दिव्यांगांना दरमहा ३५ रुपयात अंत्योदय योजनेअंतर्गत ३५ मिलो धान्य देण्यात यावे सद्याच्या महागाईच्या काळात एक हजार अनुदान हे कमी असुन ते ५००० करण्यात यावे . मागण्या १५ दिवसात मान्य न झाल्यास तहसील ऑफीस समोर आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज गेडाम यांनी जाहीर केले . ठिय्या आंदोलनात समाधान रंगारी , छगन वाकडे , नितेश नागपुरे , भाउराव वासनिक , सचिन हातागडे , पवन मडावी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

Copyright ©