Breaking News यवतमाळ राजकीय

*शिवसेना प्रणित ग्रामपंचायत महाळुगी विजयी उमेदवारांना भाजपा प्रणित दाखवल्याने उमेदवार संतप्त*

 

 

आर्णी/ नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत

मौजा महालुंगी येथे शिवसेना प्रणित आघाडीने बाजी मारून 9 पैकी 5 उमेदवार निवडून आणून ग्रामपंचायत महाळुंगी वर भगवा फडकवला

काल दि 24/01/2021 रोजी विजयी उमेदवार नामे आलसिंग बंडू पवार,अनिल राठोड,सोनल राठोड,बळीबाई राठोड,लिलाबाई राठोड सर्व गावातील विकासात्मक कामाविषयी चर्चा करण्या करीत भाजपा आमदार संदीप धुर्वे यांना भेटायला गेले.सर्व विजयी उमेदवारांचे आमदार संदीप धुर्वे यांनी पुष्प गुछ सॅनिटाइझर देऊन अभिनंदन केले

यवतमाळ येथून सर्व विजयी उमेदवार घरी परतले.पण आज रोजी विषय असा झाला की आमदार संदीप धुर्वे यांचे स्वीय सहायक यांच्या ऑफिशियल फेसबुक पेज वर सर्व शिवसेना प्रणित महालुंगी ग्रामपंचायत विजयी उमेदवार हे भाजप प्रणित असल्याचे फोटो अपलोड केले असाच प्रकार कवठा बाजार येथे सुद्धा आढळून आला आहे.

या प्रकारा मुळे शहरातील शिवसैनिका मध्ये रोष दिसून आला सदस्यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.

Copyright ©