Breaking News यवतमाळ सामाजिक

*महिंद्रा पिकअपला दुचाकीची धडक  एक जागीच ठार एक गंभीर जखमी*   

 

 

 

करंजी प्रतिनिधी :-   राष्ट्रीय महामार्ग नागपूर हैद्राबाद करंजी महामार्ग वर ढोकी रोड जवळ महिंद्रा पिकअप क्र एम एच 40 ए के 5348 व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला यात एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना 24 चे रात्री 7 वाजताच्या दरम्यान घडली.

पिकअप गाडी ढोकी वरून येत होती तर तर दुचाकी नागपूर वरून येत होती दरम्यान महामार्गावरील दुभाजक ओलांडताना सामोरा समोर

महिंद्रा पिकअप आडवी आल्यामुळे दुचाकीला जबरदस्त धडक बसली यात दुचाकी दुचाकी चालक  अमोल विलास घोसले गणेशपुर  वय 25 वर्ष हा जागीच ठार झाला  तर देवेंद्र भोसले  वय 30 हा गंभीर जखमी झाला त्याला करंजी ग्रामीण रुग्णालय येथे  प्रथमोपचार करून  जिल्ह्या रुग्णालय यवतमाळ येथे पुढील उपचारा करिता  पाठविण्यात आले  महामार्गावरील दुभाजक ची उंची व रस्त्याची उंची  सारखी झाल्यामुळे वारंवार  अपघात   होत असतात  तुटलेले दुभाजक बंद करून दुभाजकाची उंची वाढविण्याची मागणी करंजी व परिसरातील जनता वाहन धारक करीत आहे

Copyright ©