यवतमाळ सामाजिक

*माळेगांव येथिल सुनिल चव्हाण पॉवर ऑफ इंडिया,या नॅशनलअवॉर्डने सन्मानित…..!*

 

“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

 

सावळी सदोबा:-

गणराज्य दिनानिमित्त पत्रकार भवन एस.एम जोशी सभागृहात नवी पेठ पुणे येथे दि २४ जानेवारी २०२१ ला साई आनंद संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता,या सोहळ्यात जिव्हाळा कला संचाचे कलावंत सुनील रामचंद्र चव्हाण माळेगांव ता.आर्णी जि.यवतमाळ यांना मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पॉवर ऑफ इंडिया नॅशनल अवार्ड २०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सुनील चव्हाण यांनी स्त्री व पुरुषाच्या आवाजात गीते गाऊन रसिकांना अक्षरशःभारून टाकले या समारंभाचे अध्यक्ष मधुकरजी देसाई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नम्रता दुबे, डॉ.एस.आर जशरीदा, अनंत पाटील योगेश अहिरे हे होते.

Copyright ©