यवतमाळ सामाजिक

*राममंदिर बांधकाम निधी संकलन ग्रामीण भागातून सुरू !*

 

 

 

आज दिनांक २३ जानेवारी रोजी अयोध्या राममंदिर बांधकाम निधी अंतर्गत संघाचे तालुका कार्यवाह विनोदजी पेरकावार व विश्वहिंदू परिषदे चे कार्यकर्ते प्रसाद नावलेकर ह्यांनी ग्रामीण भागात राममंदिर निर्माण निधी संकनलनासाठी जनसंपर्क प्रवास केला .त्याच प्रमाणे तालुक्यात प्रमुख कार्यकर्ते सम्पर्क करीत असून हा पहिला टप्पा आहे त्या अनुषंगाने अकोली खुर्द येथील जगन्नाथजी जैस्वाल,नामदेवराव वाढई ,मराठवाकडी येथील सुरेश शानमवार,केळापूर येथील देवराव भूपतवार ,खैरगाव (दे) येथे गेलो गावातील अशोकजी देशतट्टीवार,अजयजी राजूरकर,दौलत नैताम,गणेश पुप्पलवार शेवटी नागोराव नैताम ह्यांची भेट झाली !

सर्वांनी रु 2000 किंवा अधिक निधी दिला त्यांना रीतसर पावती देण्यात आली . पण जेव्हा आमची भेट नागोरावजी नैताम वय 79 ह्यांची भेट झाली आणि त्यांनी रु 2000 दिले त्याचे मौल करता येणार नाही .त्याच अस म्हणणं होतं रोज टीव्ही ,वर्तमान पत्रात राममंदिर बांधकाम करीता निधी संकलन सुरू आहे आपले योगदान कसे द्यायचे म्हणून त्यांना रात्री झोप येत नव्हती आमची भेट झाली तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी रु 2000 दिले व रामदूत म्हणून तुम्ही आला असे म्हणून त्यांचा कंठ दाटून आला.एव्हढेच नाही तर ते हनुमान जयंतीला संपूर्ण गावाला भोजन देतात !ते हा उत्सव म्हणून साजरा करतात ! आमच्या सोबत त्या गावातील राहणारे तालुका सेवाप्रमुख सचिन बोरतवार, स्वयंसेवक रुपेश वाघाडे होते. त्यांनी आमच्या समोर त्यांना विनंती केली ह्या वर्षी पासून गावकरी सुद्धा आपल्या हनुमान जयंतीच्या कार्यास मदत करू आणि आज पर्यंत ते कोणाचीच मदत न घेणारे नागोरावजी ह्यांनी हे मान्य केले !

संपूर्ण केळापूर तालुक्यात राममंदिर बांधकाम निधी संकलन अभियान रवी ध्यावरशेट्टीवार ह्यांचे मार्गदर्शनात सुरू आहे .

Copyright ©