Breaking News यवतमाळ सामाजिक

**उजोणा येथे बर्ड प्ल्यु चे थैमान- १६ कोंबडयांचा बर्ड प्लु ने मृत्यु* – *तालुका पथका कडून अनेक कोंबड्याचा सफाया*

   -मागील काही दिवसापूर्वी पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याने याची चौकशी केली असता संशय आल्याने त्याचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले यातून हा प्रसार बर्ड फ्लूचा असल्याचे निष्पन्न झाले असता प्रथमच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यासंदर्भात काळजीपूर्वक कार्यवाही सुरू आहे. यातूनच दारव्हा तालुक्यामधील आज दि २४ जानेवारी रोजी उजोना येथे अनेक दिवसांपासून पक्षांवर हा प्रकार दिसून येत होता काही परिसरात अनेक पक्षी मरण पावल्याचे दिसून आले. यानंतर कोंबड्यांवरती सुद्धा हा आजार दिसून आला.असल्यामुळे तालुका पथक उजोना येथे दाखल होऊन त्यांनी काऱ्यवाई सुरू केली यात संपूर्ण गावाचा सर्वे सुरू असून सोबतच फवारण्या सुद्धा करण्यात आल्या आहे यावेळी,

दारव्हा तालुक्यातिल उजोणा येथे बर्ड प्ल्यु चे आगमन होताच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले, उजोणा येथे १६ कोंबडयांचा बर्ड प्लु ने मृत्यु गावापासुन एक किलोमिटर परिसर बाधीत क्षेत्र तर १ते१० किलोमिटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणुन घोषीत करण्यात आला दारव्हा तालुक्यातिल उजोणा येथे गावराण कोंबडयाचे कुकुटपालन करणाऱ्याकडे आठ दिवसांपर्वुी कोंबडयाचा मृतिव होत असल्याने गावातील काहींनी तहसीलदार दारव्हा यांच्याकडे माहीती दिली होती. त्यामुळे दारव्हा लघु पशुवैद्यकीय चिकीत्सालयाच्या टिमने उजोना येथे जावुन मृत पक्षांचे नमुने घेवुन ते दि.१५ जानेवारीला भोपाळ येथील प्रयोग शाळेमध्ये तपासणी साठी पाठविण्यात आले होते. काल दि. २३ जानेवारीला संध्याकाळी पाठविण्यात आलेल्य्या नमुण्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असुन त्यामध्ये उजोणा येथील १६ कोंबडयांचा मृत्यु हा बर्ड प्ल्यु ने झाल्याने निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तालुक्यातिल प्रशासकीय यंत्रणा खळबळुन जागी झाली असुन २४ जानेवारीला उजोणा येथे गावातिल इतर कुकुट पक्षी, अंडी व कुक्कुट पक्षांची खाद्य याची शास्त्रोक्त पध्दतिने विल्हेवाट लावण्यात आली आहे.तसेच १ ते १० किलोमिटर निगराणी क्षेत्रातिल कुक्कुट पक्षी,पशुखाद्य व अंडी यांचे निगराणी क्षेत्राबाहेरील वाहतुक ९० दिवस होईपर्यंत प्रतिबंधीत करण्या चे आदेश जिल्हाधिकारी एम.देवेन्द्रसिंह यांनी दिले आहे. आज उजोणा येथे दारव्हा तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ.पि.पि.नेमाडे, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सुदर्शन ढोले,डॉ.अनंत खोडवे,दारव्हा लघुवैद्यकीय पशुचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.किशोर बन्सोड,लोही येथील डॉ.मनीषा डोनेकर यांना पथक प्रमुख म्हणुन यांच्या मार्गदर्शनात पथक गठीत करण्यात आली.तसेच आज दि. २४ जानेवारीला सकाळच्या सत्रात गावातिल ३०४ कुकुट पक्षी व ११९ अंडी यांची शास्त्रोक्त पध्दतिने विल्हेवाट लावण्यात आली.यावेळी दारव्हा तालुक्यातिल पशु संवर्धन विभागातिल सर्व पशुधन पर्यवेक्षक,परिचर,तसेच उजोना गावचे ग्रामसेवक,तलाठी,लाडखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर कामाला गती दिली असुन प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

Copyright ©