यवतमाळ सामाजिक

*महिलांना राजकाम प्रशिक्षण* 

 

 

कापरा (मेथड) ह्या गावातील महिलांना नवे कौशल्य शिकता यावे व त्यांना सातत्याने रोजगार मिळावा म्हणून उद्धार बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ च्या वतीने दिनांक २० आणि २१ जानेवारी, २०२१ रोजी गावातील महिलांसाठी राजकाम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये ७५ महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. ह्या प्रशिक्षणामध्ये त्यांना बांधकामाचे प्राथमिक धडे देऊन प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळाली. ह्या उपक्रमामध्ये आशय भेले, बांधकाम अभियंता, सुनील भेले आणि वंदना ताई भेले हे साधन व्यक्ती होते. प्रशिक्षणाचे उदघाटन वैभव मून, संचालक, उद्धार ह्यांच्या द्वारे करण्यात आले तर कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी रोशन इंगळे, व्यवस्थापक, प्रेमा पत्रीवार, समन्वयक तसेच गावातील अजय कालंकार, मोहन तराळ इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. प्रशिक्षणाची सांगता महिलांना प्रमाणपत्र व अल्पोपहार वाटून करण्यात आली.

Copyright ©