यवतमाळ सामाजिक

शिळोणा घाटात मालवाहतुक जळून खाक

 

उमरखेड-पुसद हा राज्यमार्ग २१३म्हणुन ओळखला जातो. हे दोन्ही शहरे तालुक्याचे ठिकाण असल्याने ह्या मार्गावर जास्त रहदारी चालु असते. एखादा अपघात झाला असता हा राज्यमहामार्ग रस्ता जाम होत असतो. काल दि.२२/१/२१ रोजी शुक्रवार रात्री ७.३०च्या सुमारास पुसद वरून किराणा माल भरून मालवाहतुक गाडी क्रएम एच २६
बीई १२०२ ही शिळोणा घाट चढुन आल्यावर गाडीच्या इंजीन गरम झाल्यामुळे शाॅटसर्कीट झाल्याने मालवाहतुकीने पेट घेतल्याचे वाहकाच्या लक्षात येताच गाडी तुन उतरल्याने जिवीत हानी न होता गाडीने पुर्ण पणे पेट घेतल्याने ही बाब पोफाळी पोलीस स्टेशनला कळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच ठाणेदार कैलास भगत तातडीने आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठुन अग्नीशामक दलाला पाचारण करुन आग आटोक्यात आणली अन्यथा सभोवताल जंगल भाग असल्यामुळे जंगलात आग पसरण्याची भीती ना करता येत नव्हती .पं.स.उमरखेडचे विस्तार अधिकारी संतोष डाखोरे, देवानंद गायकवाड ,राहुल बोद्रे, वनरक्षक टोगळे,तानाजी कनवाळे,शिवाजी कनवाळे लोटागण महाराज हेमत बारसकर , बोरसे,आदी मंडळीने आग विझविण्यात मोलाचे सहकार्य केले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©